Kalyan murder : दारू पार्टी ठरली अखेरची! किरकोळ वादातून कल्याण येथे मित्राची हत्या-kalyan murder news friend killed a friend over dispute called the police himself after the murder ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kalyan murder : दारू पार्टी ठरली अखेरची! किरकोळ वादातून कल्याण येथे मित्राची हत्या

Kalyan murder : दारू पार्टी ठरली अखेरची! किरकोळ वादातून कल्याण येथे मित्राची हत्या

Jan 24, 2024 11:44 AM IST

Kalyan Crime News : कल्याण येथील मानपाडा येथे एकाला दारू पार्टी देणे जिवावर बेतले आहे. किरकोळ वादातून मित्राने मित्राची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

kalyan murderd news
kalyan murderd news

Kalyan Crime News : कल्याण येथे एका तरुणाला दारू पार्टी देणे जिवावर बेतली आहे. दारू पितांना किरकोळ कारणावरून वाद झाल्याने एकाने आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून आरोपीने स्वत: पोलिसांना खून करत मित्राची हत्या केल्याची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

Ahmednagar Accident News : अहमदनगर-कल्याण मार्गावर भीषण अपघात; कार, बस व ट्रॅक्टरच्या धडकेत ६ ठार

वाजिद सय्यद असे खून झालेल्या मित्राचे नाव आहे. तर परेश शिलकर असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मलंग रोड परिसरात परेश शिलकर व वाजिद सय्यद हे पार्टनरशिपमध्ये चायनीज गाडी सुरु करणार होते. या साठी दोघांची तयारी झाली होती. दोघांचेही चायनीज सेंटर काही दिवसांत सुरू होणार होते. दरम्यान, याचा आनंद साजरा करण्यासाठी वाजिद सय्यदने मित्रांना पार्टी देण्याचे ठरवले. येथे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत त्याने मित्रांना बोलावून पार्टी दिली. त्यांची पार्टी सुरू असतांना वाजिद व परेशमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला.

Republic Day 2024 : राजपथावरील संचलन पाहायचंय? असं करा ऑनलाइन व ऑफलाइन बुकिंग

या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. परेशने वाजिद सय्यदवर लोखंडी पत्र्याने हल्ला केला. यात वार वर्मी लागल्याने वाजिदचा जागीच मृत्यू झाला. यानंतर परेशनेच थेट कंट्रोल रूमला फोन करून मित्राचा खून केल्याची माहिती दिली. मानपाडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परेशला अटक केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, कल्याणमध्ये किरकोळ कारणावरून एकमेकांच्या जिवावर उठण्याचे प्रकार वाढले आहे. येथील वाढती गुन्हेगारी रोखणे पोलिसांना आव्हान बनले आहे. टिटवाळा ग्रामीण भागातील म्हारळ येथील सूर्यानगर परिसरात देखील मित्रामद्धे वाद झाल्याने एकाने थेट मित्रावर गोली झाडली. रोहित भालेकर परवेज शेख, सुनिल वाघमारे, समीर चव्हाण आणि राजन येरकर हे दारू पित असतांना त्यांच्यात वाद झाले. या वादातून रोहित भालेकर याने परवेजच्या कमरेला असलेल्या देशी कट्टा काढून राजन येरकरवर गोळी झाडून त्याचा खून केला.

Whats_app_banner