मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Republic Day 2024 : राजपथावरील संचलन पाहायचंय? असं करा ऑनलाइन व ऑफलाइन बुकिंग

Republic Day 2024 : राजपथावरील संचलन पाहायचंय? असं करा ऑनलाइन व ऑफलाइन बुकिंग

Jan 24, 2024 10:55 AM IST

Republic Day 2024 Parade booking : प्रजासत्ताक दिवस जवळ येत आहे. दिल्ली येथील कर्तव्य पथावर होणारी भव्य संचलन पाहण्यासाठी जगभरातून नागरिक येत असतात. हे संचलन पाहणे म्हणजे एक पर्वणी असते. या साठी घरबसल्या ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने तिकीट बूकिंग करता येईल.

Republic Day 2024 Parade booking
Republic Day 2024 Parade booking (File photo)

Republic Day 2024 Parade booking : भारतीय प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी राजधानी दिल्लीच्या कर्तव्य पथावर सुरू आहे. पहाटेच्या कडक्याच्या थंडीत ही तयारी जोरदार सुरू आहे. या संचलनात देशाचे लष्करी सामर्थ्य आणि विविधतेचे दर्शन घडत असते. ही वैभवशाली परेड तुम्हाला पाहायची असेल तर त्यासाठी तिकीट काढावे लागते. ही तिकिटं कशी, कुठे आणि कधी खरेदी करायची जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

अहमदनगर-कल्याण मार्गावर भीषण अपघात; कार, बस व ट्रॅक्टरच्या धडकेत ६ ठार

यंदाचा प्रजासत्ताक दिवस हा ७५ प्रजासत्ताक दिवस आहे. शुक्रवारी पहाटे या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. ही परेड ९.३० ते १० वाजता सुरू होईल. या संचलनाचा मार्ग हा विजय चौक ते इंडिया गेट कर्तव्य पथावरून ५ किमी अंतराचा आहे. हा सोहळा पाहण्यासाठी तिकीटांची आरक्षित किंवा अनारक्षित जागांसाठी किंमत ही ५०० पासून २० रुपयापर्यंत आहे.

असे बूक करा ऑनलाइन तिकीट

प्रजासत्ताक दिन परेडसाठी ऑनलाइन तिकीट विक्री १० जानेवारी २०२४ पासून सुरू झाली आहे. ही तिकीट विक्री उद्या २५ जानेवारीपर्यंत सुरू राहील. तिकिटांची उपलब्धता दररोजच्या वाटपावर अवलंबून असेल. तिकीट वाटप सुरू होण्याच्या काही कालावधीत ती संपण्याची शक्यता असल्याने शक्य तितक्या लवकर आपली तिकिटे काढावी. ऑनलाइन तिकिटे खरेदी करण्यासाठी, तुम्हाला खालील पद्धती अवलंबव्या लागतील.

- साइन इन किंवा नोंदणी करण्यासाठी तुमचे नाव, ईमेल पत्ता, मोबाईल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ठ करा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP आल्यावर तुमची ओळख सत्यापित करा.

-ड्रॉपडाउन मेनूमधून इच्छित कार्यक्रम निवडा: FDR प्रजासत्ताक दिन परेड, प्रजासत्ताक दिन परेड किंवा बीटिंग द रिट्रीट असे पर्याय तुम्हाला दिसतील.

- प्रत्येक तिकिटासाठी, पडताळणी म्हणून तुमचे नाव, पत्ता, वय, लिंग आणि फोटो आयडी द्या. कृपया फोटो आयडी म्हणून तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा आधार कार्डची स्कॅन केलेली प्रत उपलोड करा.

- तुम्ही खरेदी करू इच्छित असलेल्या तिकिटांची श्रेणी आणि संख्या निवडा. आरक्षित जागांसाठी पर्यायी तिकिटांची किंमत ही ५०० रुपये आहे. तर अनारक्षित जागांसाठी १०० रुपये तर प्रतिबंधित दृश्यासह अनारक्षित जागेसाठी २० रुपये तिकीट दर आहे. एका व्यक्तीला चार तिकिटे विकत घेता येऊ शकते.

- तिकीट खरेदी करण्यासाठी तुम्ही वॉलेट, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ऑनलाइन बँकिंग किंवा UPI पद्धतीचा वापर करू शकता. पेमेंट झाल्यावर तुम्हाला जागा मिळाल्याचा ईमेल आणि एसएमएस मिळेल. यात तुमच्या बुकिंगचे तपशील आणि QR कोड असेल.

-तुमचे ई-तिकीट डाउनलोड करून त्याची प्रत काढून घ्या. सोहळ्याच्या दिवशी तुमच्या मूळ फोटो आयडी पुराव्यासह सोबत ठेवावे. प्रवेशासाठी एंट्री गेटवर QR कोड स्कॅन करा.

या पद्धतीने खरेदी करा ऑफलाइन तिकिटे

प्रजासत्ताक दिन परेडची ऑफलाइन तिकीट विक्री ही ७ जानेवारीपासून सुरू झाली आहे. ही विक्री २५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. आठवड्याच्या दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ५ आणि रविवार आणि सुट्टीच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत तिकिटे विक्री केली जाणार आहे. दिल्लीत अनेक ठिकाणी ही तिकीट विक्री केंद्र उपलब्ध आहेत.

-ऑफलाइन तिकीट खरेदीसाठी अधिकृत विक्री केंद्रांवर किंवा नियुक्त प्रजासत्ताक दिन तिकीट काउंटरवर जा.

- तिकीट विक्री केंद्रांवर तुमच्या ओळख पत्राची छायांकित प्रत आणि तुमचा मूळ फोटो आयडी द्या. आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स ही ओखपत्र या केंद्रावर स्वीकारली जातात.

- तुम्ही खरेदी करू इच्छित असलेल्या तिकिटांची श्रेणी आणि संख्या निवडा.

- तिकीटाचे तीन भिन्न पर्याय आहेत: आरक्षित जागा ५०० रूपीने, आरक्षित जागा १०० रुपये, तर लांबच्या अनारक्षित जागेसाठी २० रुपये तिकीट दर आहेत. तुम्ही प्रति व्यक्ती चार तिकिटे खरेदी करू शकता.

- रोख पैसे भरल्यानंतर काउंटरवरून तुमची तिकिटे आणि पावत्या मिळवा.-

कार्यक्रमाच्या दिवशी, तुमची तिकिटे आणि मूळ फोटो ओळखपत्र सोबत ठेवावे लागेल. प्रवेशद्वारावर त्याची पडताळणी करून तुम्हाला प्रवेश दिला जाईल.

टी-२० वर्ल्डकप २०२४