Rohit Pawar ED Inquiry : बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी आमदार रोहित पवार यांची आज ईडी मार्फत चौकशी केली जाणार आहे. त्यांना आज ईडी कार्यालयात बोलावण्यात आले आहे. दरम्यान, रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी स्वत: शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या जाणार आहेत. या सोबतच रोहित पवार हे यावेळी शक्ति प्रदर्शन करण्याच्या तयारीत देखील आहेत. चौकशी बाबत मी पूर्ण सहकार्य करणार असून कार्यकर्त्यांनी शांततेची भूमिका घ्यावी असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.
राष्ट्रवादीतील फुटीमुळे अनेक राजकीय घडामोडी होतांना दिसत आहे. शरद पवार गटातील अनेकांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या मागे देखील ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. बारामती अॅग्रोमधील कथित घोटाळ्या प्रकरणी ईडीने बारातमी येतील बारामती अॅग्रोच्या कार्यालयावर छापेमारी केली होती. त्यानंतर आज त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. बारामती अॅग्रोची मालकी ही आमदार रोहित पवार यांच्याकडे आहे. यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय ईडीला आहे. त्यामुळे ही छापेमारी करण्यात आली. गेल्या वर्षी देखील ईडीने रोहित पवार यांना नोटिस बजावली होती. त्यांतर छापेमारी केल्यावर आज त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
या बाबत रोहित पवार म्हणाले, मी राज्य सरकारच्या बाबतीत जी काही भूमिका आणि प्रश्न उपस्थित केले आहे, त्यामुळे माझ्यावर दबाव आणण्यासाठी ही चौकशी केली जात आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून माझ्यावर दबाब आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असले तरी तपास यंत्रानांना सहकार्य करणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
महावीकस आघाडीच्या नेत्यांवर ईडीने फास आवळला आहे. या पूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तर आमदार रवींग्र वायकर यांनाही ईडीनं चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. जोगेश्वरीतील भूखंडप्रकरणी वायकरांची चौकशी सुरू आहे. त्यानंतर आज रोहित पवार यांची चौकशी केली जाणार आहे.
संबंधित बातम्या