मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ahmednagar Accident News : अहमदनगर-कल्याण मार्गावर भीषण अपघात; कार, बस व ट्रॅक्टरच्या धडकेत ६ ठार

Ahmednagar Accident News : अहमदनगर-कल्याण मार्गावर भीषण अपघात; कार, बस व ट्रॅक्टरच्या धडकेत ६ ठार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 24, 2024 10:32 AM IST

ahmednagar kalyan highway accident : नगर-कल्याण मार्गावर बस, कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत ६ जण ठार तर काही जण जखमी झाले आहेत.

ahmednagar kalyan highway accident
ahmednagar kalyan highway accident

ahmednagar kalyan highway accident : अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. हा अपघात नगर कल्याण मार्गावर २.३० च्या सुमारास झाला आहे. एक कार, बस आणि ट्रॅकरची जोरदार धडक झाली असून यात ६ जण ठार झाले आहे. तर काही जण जखमी झाले आहे. घटनास्थळी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अपघातानंतर या मार्गावर वाहतुक कोंडी झाली होती. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Mumbai Weather Update : मुंबईतील तापमानाचा पारा १४.८ अंशांवर; हंगामातील सर्वात कमी तापमान

या अपघात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे अद्याप समजू शकली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नगर कल्याण मार्गावर रात्री २.३० च्या सुमारास उस वाहतूक करणारा ट्रक्टर, एक कार आणि ठाणे – मेहकर एस.टी बस यांची या मार्गावरील ढवळपुरी फाट्याजवळ जोरदार धडक झाली. तिन्ही वाहने भरधाव वेगात एकमेकांना धडकल्याने वाहनांचा चक्काचूर झाला.

Rohit Pawar : रोहित पवारांची आज ईडी चौकशी; बारामती अ‍ॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरण

या भीषण अपघातात ६ जण जागीच ठार झाले आहे. तर काही नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा आवाज येताच स्थानिक नागरिक आणि रस्त्यावरील प्रवासी वाहनांमधील नागरिक मदतीसाठी धावले. तसेच या अपघाताची माहिती पोलिसांना देकयात आली.

अपघातातील जखमी झालेल्यांना तातडीने प्राथामिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती स्थिर तर काहींची चिंताजनक आहे. काही जखमी नागरिकांना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करत येथील वाहतूक सुरळीत केली.

WhatsApp channel