मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Weather Update : मुंबईतील तापमानाचा पारा १४.८ अंशांवर; हंगामातील सर्वात कमी तापमान

Mumbai Weather Update : मुंबईतील तापमानाचा पारा १४.८ अंशांवर; हंगामातील सर्वात कमी तापमान

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 24, 2024 09:31 AM IST

Mumbai Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. मुंबईत देखील तापमानात कमालीची घट झाली आहे. मंगळवारी मुंबईत हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली.

Mumbai winter update
Mumbai winter update

Mumbai Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. मुंबईत देखील तापमानात कमालीची घट झाली आहे. मंगळवारी मुंबईत हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. मुंबईतील तापमान १५ अंश सेल्सिअसच्या खाली घसरले. भारतीय हवामानशास्त्र विभागच्या सांताक्रूझ वेधशाळेने १४.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली. तर तर कुलाबा वेधशाळेत १९.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यात पुढील काही दिवस थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता देखील हवमान विभागाने वर्तवली आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Rohit Pawar : रोहित पवार हाजिर हो! आज होणार ईडी चौकशी; बारामती अ‍ॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरण

हवामान विभागाचे वरिष्ठ अधिकारी के.एस. होसाळीकर यांनी मुंबईच्या हवामानाबाबत ट्विट केले आहे. मुंबईवेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी मुंबईत हंगामातील सर्वात कमी किमान तापमान नोंदवले गेले. दिवसाचे सरासरी तापमान ३० अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवले गेले. तर कमाल तापमान हे १५ डिग्री सेल्सिअसच्या खाली गेले होते.

मुंबईत या महिन्यात थंडी वाढली आहे. किमान तापमान २० अंश सेल्सिअसच्या खाली घसरले असून सर्वाधिक कमी तापमानात हे सांताक्रूझ येथे नोंदवले गेले. येथील वेधशाळेने रविवारी मुंबईतील हंगामातील दुसरा सर्वात थंड दिवस अनुभवला. येथे रविवारी कमाल तापमान हे १६.१ अंश सेल्सिअस इतके कमी झाले होते. तर मंगळवारी १४.८ ऐवढे कमी तापमान नोंदवले गेले.

Maharashtra weather update : विदर्भाला अवकाळीचा फटका! आजही पावसाचा अलर्ट; राज्यात गारठा वाढला

उत्तर-पश्चिमेकडील थंड वाऱ्यांमुळे शहरात थंडी जाणवत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रवाहामुळे येत्या काही दिवसांत मुंबईत आल्हाददायक वातावरण राहणार आहे. हवामान खात्याने उत्तर आणि मध्य भारतासाठी थंडीचा रेड आणि यलो अलर्ट जरी केला आहे. तर पुढील दोन दिवस राजस्थान, हरियाणा, पंजाब, बिहार आणि उत्तर प्रदेशसह अनेक उत्तर भारतीय राज्यांसाठी 'कोल्ड डे अलर्ट' जारी केला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार मुंबईत आजपर्यंतचे किमान तापमान जानेवारीत १३.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. गेल्या वर्षी जानेवारीत १३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मंगळवारी महाराष्ट्रात सर्वात कमी तापमान जळगाव शहरात ९.६ अंश सेल्सिअस आणि त्या खाली नाशिकमध्ये १०.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. साताऱ्यात १२ अंश सेल्सिअस, तर पुण्यात १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. २४ आणि २५ जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्रात तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास घसरेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

WhatsApp channel