मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Indapur : ग्रामस्थांच्या विरोधानंतर गौतमी पाटीलचा लावणी कार्यक्रम रद्द; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Indapur : ग्रामस्थांच्या विरोधानंतर गौतमी पाटीलचा लावणी कार्यक्रम रद्द; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 28, 2022 08:12 AM IST

Gautami Patil : पुणे जिल्ह्यात गौतमी पाटीलचा लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु हा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आल्यानं अनेकांना धक्का बसला आहे.

Gautami Patil Lavni Program In Pune
Gautami Patil Lavni Program In Pune (HT)

Gautami Patil Lavni Program In Pune : प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना सातत्यानं होणारा विरोध आता वाढताना दिसत आहे. कारण आता गौतमी पाटीलचा पुणे जिल्ह्यातील आयोजित कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील इंदापुरच्या निमगाव केतकीमध्ये गौतमी पाटीलचा लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु गावकऱ्यांनी नृत्याच्या कार्यक्रमासाठी जागा नाकारल्यानं हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं बोललं जात आहे. लावणी कार्यक्रमात गौतमी पाटील ही अश्लिल नृत्य आणि आक्षेपार्ह हातवारे करत असल्याचा आरोप काही सामाजिक संघटनांनी केला होता. त्यानंतर आता गौतमी पाटीलचा पुण्यातील आयोजित कार्यक्रम ऐनवेळी रद्द झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

जबरदस्त नृत्यानं संपूर्ण तरुणाईला वेड लावणारी सोशल मीडिया स्टार नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातल्या निमगाव केतकी या गावात २७ डिसेंबर म्हणजे काल लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु या गौतमीच्या कार्यक्रमासाठी गावकऱ्यांनीच जागा देण्यास नकार दिल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत असतानाच आता तिचा पुण्यातील कार्यक्रम रद्द झाल्यानं त्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

सांगली जिल्ह्यातील बेडग या गावात गौतमी पाटीलचा लावणी कार्यक्रम सुरू असताना तिथं तरुणांनी मोठी गर्दी उसळली होती. असंख्य लोक छतावर चढल्यानं कौलारू छत कोसळून एका तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. याशिवाय उसळलेल्या गर्दीमुळं शाळेच्या पटांगणावरील एक झाड पडले होते. त्यामुळं तरुणांना वाममार्गाला लावणाऱ्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर कायमची बंदी घालण्याची मागणी कोल्हापुरातील राष्ट्र स्वराज्य संघटनेनं केली होती.

IPL_Entry_Point