मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  New Year Party : थर्टी फर्स्टला दारू पिण्यासाठी लागणार लायसन्स; एका दिवसाचं शुल्क किती?

New Year Party : थर्टी फर्स्टला दारू पिण्यासाठी लागणार लायसन्स; एका दिवसाचं शुल्क किती?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 28, 2022 09:24 AM IST

Thirty First Party : दरवर्षी मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबादमध्ये ३१ डिसेंबरला जोरदार सेलिब्रेशन करत नव्या वर्षाचं जंगी स्वागत केलं जातं. यावेळी मोठ्या प्रमाणात मद्यविक्रीही होत असते.

New Year Party In Mumai-Pune
New Year Party In Mumai-Pune (HT)

New Year Party In Mumai-Pune : नववर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक लोकांनी पार्टीचं नियोजन केलेलं आहे. शहरांमध्ये जोरदार सेलिब्रेशन करत नववर्षाचं जंगी स्वागत केलं जातं. यावेळी मद्यप्रेमी मनसोक्तपणे मद्यप्राशन करत असतात. याशिवाय अनेक लोक हॉटेलमध्ये जेवण करून पबमध्ये मजामस्ती करण्यास प्राधान्य देत असतात. परंतु आता यंदाचा थर्टी फर्स्ट जोरात साजरा होणार असल्यानं पुण्यात उत्पादन शूल्क विभागानं तळीरामांसाठी वनडे परमिट जारी केलं आहे. हॉटेल, बार यांना मद्यविक्रीसाठी आणि मद्यप्रेमींना मद्यप्राशन करण्यासाठी परवाना लागणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानं याबाबतची माहिती दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, थर्टी फर्स्टला विनापरवाना मद्यविक्री आणि मद्यप्राशन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचं विभागामार्फत सांगण्यात आलं आहे. पुण्यात आतापर्यंत १ लाख ६५ हजार लोकांना एक दिवसासाठी मद्यप्राशन करण्याचा परवाना उत्पादन शूल्क विभागानं दिला आहे. हे सर्व परवाने हॉटेल आणि बारवाल्यांकडे देण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे. यात कोणतंही बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे.

काय आहे वनडे परमिटची किंमत?

थर्टी फर्स्टला मद्यप्राशन करण्यासाठी राज्य उत्पादन शूल्क विभागानं जारी केलेल्या परवान्याची किंमत पाच हजार रुपये इतकी आहे. त्यामुळं थर्टी फर्स्टला देशी अथवा विदेशी दारु पिण्यासाठी मद्यप्रेमींना परवाना घ्यावा लागणार आहे. थर्टी फर्स्टला राज्य उत्पादन शूल्क विभाग १० पथकांद्वारे गस्त घालत अनधिकृत ढाबे, फॉर्म हाऊस आणि शहरातील विविध ठिकाणी गाड्यांची तपासणी करणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली आहे. याशिवाय केवळ डिसेंबर महिन्यात अनधिकृत मद्य विक्री संदर्भात तब्बल २४० गुन्हे दाखल झाले असून १७ वाहनांसह ५० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळं आता नववर्षाच्या स्वागताच्या सेलिब्रेशनवेळी कारवाईचे हे आकडे वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

IPL_Entry_Point