मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Wardha : वर्धा जिल्ह्यात दारूबंदीचा फार्स; बनावट दारू कारखान्याचा पोलिसांनी केला पर्दाफाश

Wardha : वर्धा जिल्ह्यात दारूबंदीचा फार्स; बनावट दारू कारखान्याचा पोलिसांनी केला पर्दाफाश

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 30, 2023 08:32 AM IST

Wardha : गांधी जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला आणि दारू बंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात अवैध दारूचा पुरवाहतोय. दारू तस्कर छुप्या पद्धतीने दारूची विक्री आणि निर्मिती करत असल्याचे उघड झाले आहे.

वर्धा जिल्ह्यात दारूबंदीचा फार्स
वर्धा जिल्ह्यात दारूबंदीचा फार्स (Ashok Munjani)

वर्धा : राज्यातील दारूबंदी असलेला एकमेव जिल्हा असलेल्या वर्ध्यात दारूचे पाट वाहत असल्याची धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. दारू बंदी असतांनाही छुप्या पद्धतीने दारू तयार करणारा करखान्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. यात मोठ्या प्रमाणात दारूचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

वर्धा जिल्हा दारूबंदी असलेला जिल्हा आहे. दारूविक्रीवर अंकुश लावण्यासाठी पोलिसांकडून मोठे प्रयत्न सुरू असतात. अशांत वर्ध्यालगतच्या सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये चक्क बनावट दारूचा कारखानाच सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या कारखान्यावर धाड टाकत पोलिसांनी हा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. तसेच लाखोंचा बनावट दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी केली.

जिल्ह्यातील दारूविक्री बंद व्हावी, यासाठी पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडून सतत प्रयत्न सुरू आहेत. इतकेच नव्हे तर दररोज दारूविक्रेत्यांवर कारवाई करीत गुन्हे दाखल करून दारूसाठा पकडला जातो. आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील पोद्दार बगीचा परिसरात सुरू असलेल्या अवैध बारवर कारवाई करण्यात आली होती. ही घटना ताजी असतांना शहाराजवळच दारू कारखाना आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा दारू कारखाना चिंतामणी अपार्टमेंटमध्ये सुरू होता. . पोलिसांनी लाखो रुपयांच्या बनावटी दारूच्या जवळपास एक हजारावर बाटल्या आणि दारूत मिसळविणारे द्रव्य तसेच सील आणि लेबलदेखील जप्त केले. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण परिसराची पाहणी केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, दिनेश बोथकर, अनुप कावळे, सागर भोसले, राकेश इतवारे, पवन देशमुख, धीरज राठोड, अरविंद इंगोले, अभिषेक नाईक, मंगेश आदे यांनी केली. यावेळी पोलिस निरीक्षक धनाजी जळक हेदेखील उपस्थित होते.

आरोपी विशाल भगत हा फरार आहे. तो रिकाम्या बाटल्यांमध्ये बनावट दारू तयार करून बाटल्यांना 'सीलबंद करून विकायचा. तो वर्ध्यात किंवा जिल्ह्यात कुणाला ही दारू विकायचा, याचा शोध घेतला जात आहे. आरोपीला लवकरच अटक करून ज्याला दारू विकायचा त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी यावेळी दिली.

IPL_Entry_Point

विभाग