मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urfi Javed: उर्फी जावेद प्रेग्नंट? फोटो शेअर करत हे काय म्हणाली अभिनेत्री...

Urfi Javed: उर्फी जावेद प्रेग्नंट? फोटो शेअर करत हे काय म्हणाली अभिनेत्री...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 30, 2023 07:40 AM IST

Urfi Javed: उर्फीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या एका लूकचे काही फोटो शेअर केली आहेत. या फोटोमध्ये ती कॅमेऱ्यासमोर फोटो पोज देताना दिसत आहे.

Urfi Javed
Urfi Javed

Urfi Javed Post: अभिनेत्री-मॉडेल उर्फी जावेद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. सतत काहीना काही पोस्ट करून ती चर्चेत राहत असते. उर्फी तिच्या हटके फॅशनमुळे देखील नेहमीच चर्चेत असते. आता देखील उर्फीने एका हटके स्टाईलमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये उर्फीने पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. तर, त्यावर पांढऱ्या रंगाचे पाईप परिधान केले आहेत. या फोटोत उर्फीच्या ड्रेसकडे नव्हे तर, तिच्या पोटाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. उर्फीने दिलेल्या कॅप्शनने देखील सगळेच गोंधळात पडले आहेत.

उर्फीचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना ती प्रेग्नंट असल्याचे वाटत आहे. इतकंच नाही तर हा फोटो शेअर करून उर्फीनेही लिहिलं आहे की, हा फोटो पाहून ती 'प्रेग्नंट' असल्याचं जाणवेल. मात्र, खरं काही तरी वेगळच आहे. या फोटो मधील कॅप्शनमधून उर्फीने सगळे स्पष्टीकरण दिले आहे.

उर्फीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या एका लूकचे काही फोटो शेअर केली आहेत. या फोटोमध्ये ती कॅमेऱ्यासमोर फोटो पोज देताना दिसत आहे. या फोटोंमध्ये तिचे पोट एखाद्या गर्भवती स्त्री प्रमाणे वाढलेले दिसत आहे. मात्र उर्फीने आपल्या कॅप्शनमध्ये याचा खुलासा केला आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘मासिक पाळीचा पहिल्या दिवशी माझं फोट फुगलेलं दिसतं. यात मी ‘सेमी प्रेग्नंट’ असल्यासारखी वाटत आहे.’ अर्थात उर्फी प्रेग्नंट नसून, मासिक पाळीमुळे तिचे पोट फुगीर दिसत आहे. मात्र, तिच्या व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच कल्ला केला आहे.

उर्फी जावेद सध्या तिच्या फॅशनमुळे सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. एकीकडे तिच्या कपड्यांवरून जोरदार टीका सुरू असताना, दुसरीकडे ती चक्क टॉपलेस होऊन सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे. कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना उर्फी नेहमीच सडेतोड उत्तर देत असते. सध्या देखील उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या दरम्यान सुरू असलेल्या वादामुळे हे प्रकरण प्रचंड चर्चेत आलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग