Urfi Javed: कुणी घर देता का... घर? उर्फी जावेद झाली हैराण! सोशल मीडियावर पोस्ट लिहित म्हणाली...
Urfi Javed: भाड्याने घर शोधणाऱ्या उर्फीसाठी समोर मोठी समस्या निर्माण झाली असून, तिला मुंबईत घर मिळणे कठीण झाले आहे.
Urfi Javed: नेहमी आपल्या फॅशनने सर्वांना चकित करणारी उर्फी जावेद आता पुन्हा एका नव्या अडचणीत सापडली आहे. ट्विटर अकाऊंटद्वारे तिने आपली समस्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. समस्या शेअर करताना उर्फीने सांगितले की, तिला घर शोधणे कसे कठीण जात आहे. काही घरमालक तिला ड्रेसिंग सेन्समुळे त्यांना घर देण्यास तयार नाहीत, तर काही तिच्या रोजच्या वादामुळे तिला घर देत नाहीयत. आता नाराज झालेल्या उर्फीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर चाहत्यांसोबत तिच्या समस्या शेअर केल्या आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
उर्फीने ट्विट केले की, तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे मुस्लिम घरमालक तिला घर देण्यास तयार नाहीत. हिंदू घरमालक ती मुस्लिम असल्यामुळे घर देत नाहीत. तर, काही लोक तिला दररोज मिळणाऱ्या राजकीय धमक्यांमुळे आपले घर देऊ इच्छित नाहीत. उर्फी तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. अशा परिस्थितीत भाड्याने घर शोधणाऱ्या उर्फीसाठी समोर मोठी समस्या निर्माण झाली असून, तिला मुंबईत घर मिळणे कठीण झाले आहे.
उर्फीच्या या ट्विटवर तिचे चाहतेही चिंता व्यक्त करत आहेत. काहीजण घरमालकांच्या या ‘नकार’ वृत्तीला चुकीचे म्हणत आहेत, तर काहीजण नवीन घर शोधण्यात उर्फीला मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. उर्फीच्या एका चाहत्याने तिच्या या ट्विटवर 'हे खूप चुकीचे आहे' अशी कमेंट केली आहे. त्याचवेळी दुसर्या यूजरने लिहिले की, 'मला तुझ्यासाठी वाईट वाटत आहे'. आणखी एका वापरकर्त्याने उर्फीला पुण्याला शिफ्ट होण्याचा सल्ला दिला आहे.
उर्फी जावेद सध्या तिच्या फॅशनमुळे सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. एकीकडे तिच्या कपड्यांवरून जोरदार टीका सुरू असताना, दुसरीकडे ती चक्क टॉपलेस होऊन सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे. कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना उर्फी नेहमीच सडेतोड उत्तर देत असते. सध्या देखील उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या दरम्यान सुरू असलेल्या वादामुळे हे प्रकरण प्रचंड चर्चेत आलं आहे.