मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: ‘पठाण’वर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या चाहत्यांचे किंग खानने मानले आभार! पाहा काय केलं...

Viral Video: ‘पठाण’वर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या चाहत्यांचे किंग खानने मानले आभार! पाहा काय केलं...

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 30, 2023 07:20 AM IST

Shah Rukh Khan At Mannat Balcony for Pathaan Movie celebration : बॉयकॉट ट्रेड करूनही तसेच अनेक विरोधानंतरही शाहरुख खानचा पठाण चित्रपटाने ब्लॉकबास्टरवर सुपर हीट झाली आहे. अनेक विक्रम या चित्रपटाने मोडत मोठा बिझनेस देखील केला आहे.

Shah Rukh Khan At Mannat Balcony for Pathaan Movie celebration
Shah Rukh Khan At Mannat Balcony for Pathaan Movie celebration

Pathaan : शाहरुख खानचा पठाण चित्रपट सुपर हीट झाला आहे. अनेक विक्रम या चित्रपटाने मोडत मोठा बिझनेस देखील केला आहे. या चित्रपटाला मोठा विरोध झाला असतांनाही तसेच बॉयकॉट ट्रेंड करूनही प्रेक्षकांनी सर्व विरोध झुगारून चित्रपटाला पसंती दिली आहे.  चित्रपटाला मिळाळलेल्या यशामुळे अभिनेता शाहरुख खान भलताच खुश असून त्याने अनोख्या पद्धतीने चाहत्यांचे आभार मानले आहे. किंग खान आपल्या मुंबईतील मन्नत बंगल्याच्या बाल्कनीत येत 'झुम जो पठाण' या गाण्याच्या तालावर नाचत डान्स केला. तसेच खाली उभ्या असलेल्या चाहत्यांना त्याने फ्लाइंग कीस करत आभार मानले. शाहरुख खानने सिन्गेचर पोज देऊन चाहत्यांना खूश केले. बागल्यासमोर उभे असलेले शाहरुखचे चाहते देखील त्याच्या सोबत थीरकले.

 

विरोधनंतरही सुपरहीट ठरला पठाण

शाहरुखच्या पठाण चित्रपटाला मोठा विरोध झाला होता. असे असतांना देखील चित्रपट सुपरहीट झाला आहे. हा चित्रपट नुसता हीट झाला नाही तर मोठा बिझनेस देखील चित्रपटाने केला आहे. दीपिका पडूकोन, जॉन अब्राहम, आणि सलमान खान सारखे स्टार असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. यावरुन हा चिरपट तूफान हीट ठरणार हे सिद्ध झाले होते.

या चित्रपाटाच्या यशामुळे शाहरुख खानने मन्नत बंगल्याच्या बाल्कनीत येत डान्स केला. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शाहरुखने देखील त्याच्या इंस्टाग्रामच्या पेजवर हा विडिओ शेअर केला आहे. त्याने हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिले आहे की, 'मेहमान नवाजी पठाण के घर पर.. शुक्रीया'.

IPL_Entry_Point

विभाग