मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chitra Wagh : चित्रा वाघ यांची मुक्ताफळे! चंद्रकांत पाटलांची केली महात्मा फुलेंशी तुलना, म्हणाल्या..

Chitra Wagh : चित्रा वाघ यांची मुक्ताफळे! चंद्रकांत पाटलांची केली महात्मा फुलेंशी तुलना, म्हणाल्या..

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 30, 2023 06:32 AM IST

Chitra Wagh : उर्फी जावेद हिच्या कपड्यावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या चित्रा वाघ यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे.

Chitra Wagh
Chitra Wagh

पुणे : उर्फी जावेद हिच्या कपड्यावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पुण्यात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या असून यामुळे राजकीय वाद होण्याची शक्यता आहे. चित्रा वाघ यांनी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा जोतिबा फुले यांच्याशी केल्यामुळे हा नवा वाद निर्माण झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

चित्रा वाघ ह्या रविवारी पुण्यात हळदी-कुंकाच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी वरील वादग्रस्त विधान केले. चित्रा वाघ म्हणाल्या, ‘घराघरात सावित्री झाल्या आहेत. आम्हाला आता चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या जोतिबांचा शोध आहे. काही मिनिटांपूर्वी दादा खूप छान बोलले. आज पहिल्यांदा एका महिलेला पाच पुरूषांनी ओवाळले. म्हणजे दादा नेहमीच काहीतरी वेगळे परिवर्तन घडवतात. मी नेहमी म्हणते की पुणे हे स्त्री शक्तीचे केंद्र आहे. पुण्यातूनच सर्व स्त्री शक्तीच्या चळवळींची सुरुवात झालेली आहे. आज आम्हाला सावित्री घरोघरी दिसत आहेत. मात्र, चंद्रकांत दादा आणि हेमंत रासने यांच्यासारख्या जोतिबांचा शोध मात्र आजही सुरू आहे. चंद्रकांत दादा सारखे जोतिबा समाजात जास्तीत जास्त निर्माण होवोत, अशा सुभेच्छा देते, असे शेवटी चित्रा वाघ म्हणाल्या.

वाघ यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटणार आहे. राजकीय गोटातून त्यांनी केलेल्या वकव्याचा विरोध सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका करत म्हणाले, आम्ही चित्रा वाघ यांना खूप प्रगल्भ समजत होतो, मात्र मानसिक संतुलन ढासळल्यासारखे त्या वागत आहेत नेत्यांना खूश करण्यासाठी अशी वक्तव्य करत आहात, अशी प्रतिक्रिया मिटकरी यांनी दिली आहे.

 

IPL_Entry_Point

विभाग