मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Congress leader : पुण्यात काँग्रेस पदाधिकाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल; पतसंस्थेच्या कार्यालयात संपवलं आयुष्य

Pune Congress leader : पुण्यात काँग्रेस पदाधिकाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल; पतसंस्थेच्या कार्यालयात संपवलं आयुष्य

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 24, 2023 10:22 AM IST

Pune Congress leader Suicide: पुण्यात विश्रांतवाडी येतील काँग्रेस पदाधिकाऱ्याने पतसंस्थेच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

विकास शिवाजी टिंगरे
विकास शिवाजी टिंगरे

पुणे: पुण्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विकास टिंगरे यांनी टोकाचे पाऊल उचलत आपल्या विश्रांतवाडी येथील पतसंस्थेच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. विकास टिंगरे हे पुणे शहरातील विश्रांतवाडी भागाचे काँग्रेस पक्षाचे ब्लॉक असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास टिंगरे (वय ४९, रा. पोरवाल रस्ता, धानोरी, विश्रांतवाडी) यांनी धानोरी येथील पोरवाल रस्त्यावर असलेल्या त्यांच्या पतसंस्थेच्या कार्यालयात गळफास घेतला. टिंगरे हे काल त्यांच्या धानोरी येथील पोरवाल रस्त्यावर असलेल्या पतसंस्थेच्या कार्यालयात मंगळवारी दुपारी गेले होते.

दरम्यान, ते काहीसे तानावत होते. त्यांनी जेवण देखील केले नव्हते. या ठिकाणी त्यांनी गळफास घेतला. दरम्यान, काही वेळाने कार्यालयातील कर्मचारी हे त्याच्या ऑफिसमध्ये गेल्यावर त्यांना विकास टिंगरे यांनी गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी टिंगरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले केले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे. टिंगरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, त्यांनी आत्महत्या का केली याचा तपास विश्रांतवाडी पोलिस करत आहे.

IPL_Entry_Point

विभाग