मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  भारतातील १० लाख नोकऱ्या संकटात; G 7 देशांनी रशियावर लादलेल्या नव्या निर्बंधाचा परिणाम

भारतातील १० लाख नोकऱ्या संकटात; G 7 देशांनी रशियावर लादलेल्या नव्या निर्बंधाचा परिणाम

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 24, 2023 10:02 AM IST

G-7 देशांनी रशियावर नवे निर्बंध लादले असून यामुळे रशियातील हिरे उद्योगावर परिणाम होणार आहे. त्याचा थेट फटका भारताला बसणार आहे.

surat ten lakh diamond workers
surat ten lakh diamond workers

युक्रेनवर रशियन सैन्याच्या हल्ल्याचा नाटोसह जगभरातील अनेक देशांनी विरोध केला आहे. रशियाच्या या कृतीमुळे जगभरातील अनेक देशांनी रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लादले आहेत. रशियाला ऊर्जा संकटात टाकण्याच्या दिशेने युरोपीय देशांनी पावले उचलली आहेत. रशियासोबतच्या व्यापारावर निर्बंध असतानाही भारताने तेथून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवली. मात्र, आता जी ७ देशांनी आणखी नवे निर्बंध रशियावर लादले असून याचा परिणाम थेट भारताच्या काही उद्योगांवर होणार आहे. यामुळे देशातील तब्बल १० लाख नोकऱ्या या संकटात सापडणार आहेत.

भारताने अमेरिकेचे निर्बंध झुगारून रशियातून कच्चे तेल सवलतीत खरेदी केले. तसेच या तेलापासून तयार केलेले अनेक उत्पादने युरोपीय देशांना विकून भारतीय रिफायनर्सना फायदा झाला. मात्र, आता जी ७ देशांनी रशियाच्या हीरे उद्योगावर निर्बंध लादण्याचा निर्णय घतेला आहे. हिऱ्यांच्या व्यापारावर बंदी घातल्याने भारतात दहा लाखांहून अधिक लोक बेकार होऊ शकतात.

अहवालानुसार, जगातील ९० टक्के हिरे कापून पॉलिश केले जातात. यामध्ये रशियन हिऱ्यांचाही समावेश आहे. भारत रशियातील अल्रोसा येथून हिरे आयात करतो. जगातील एकूण हिऱ्यांपैकी सुमारे ३० टक्के हिरे अल्रोसामध्ये तयार होतात. भारतीय हिरे कंपन्या आयात केलेल्या हिऱ्यांचे कटिंग आणि पॉलिशिंग करतात. यानंतर त्यांची जी-७ देशांमध्ये निर्यात केली जाते. जी-७ देशांनी रशियावर नवीन निर्बंध जाहीर केल्यानंतर जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे (जीजेईपीसी) अध्यक्ष विपुल शाह यांनी चिंता व्यक्त केली. रशियावरील ही बंदी कायम राहिल्यास भारतातील १० लाख रोजगारावर परिणाम होऊ शकतो, असे ते म्हणाले.

युक्रेन युद्धामुळे रशियावर लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे रशियन महसुलात सुमारे ५० टक्क्यांनी घट झाली. रशियाने हिऱ्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देऊन त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियाने २०२१ मध्ये हिऱ्यांच्या निर्यातीतून सुमारे ४ अब्ज डॉलर्सची कमाई केली. अमेरिका आणि युरोपियन युनियन देशांनी जर रशियन हिऱ्यांवर लादलेले निर्बंध जाहीर झाल्याने भारतीय कामगारांची चिंताही वाढली आहे.

जपानमधील हिरोशिमा येथे झालेल्या G-7 देशांच्या बैठकीनंतर संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, रशियन महसूल कमी करण्यासाठी आम्ही रशियामध्ये उत्खनन किंवा उत्पादित केलेल्या हिऱ्यांचा व्यापार आणि वापर प्रतिबंधित करणार आहोत. याबाबत आमच्याकडून पावले उचलण्यात आली आहेत. या बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी ट्रेसिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. उल्लेखनीय आहे की ज्या दिवशी भारताने रशियावर हे निर्बंध जाहीर केले त्याच दिवशी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही मोठा निर्णय घेतला.

त्यांनी रशियन हिऱ्यांच्या आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली. यूएस, यूके, कॅनडा, न्यूझीलंड आणि बहामाने एप्रिल २०२२ मध्येच रशियन डायमंड खाण कंपनी अल्रोसासोबतचा व्यापार निलंबित केला होता.

IPL_Entry_Point

विभाग