मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Update : राज्यात आज 'या' जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार बरसणार; काळजी घ्या

Weather Update : राज्यात आज 'या' जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार बरसणार; काळजी घ्या

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 24, 2023 06:48 AM IST

Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ उतार होतांना दिसत आहे. वाढत्या उन्हाबरोबर अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आज हवामान विभागाने वर्तवली आहे.

Unseasonal rains in maharashtra
Unseasonal rains in maharashtra

पुणे : आज विदर्भ ते उत्तर केरळ पर्यंत कमी दाबचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजेचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच हिंगोली, सांगली, परभणी आणि जालना या ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

पुढील चार ते पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भात कही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, भंडारा आणि यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यात पुढील काही दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने वातावरण ढगाळ राहील. रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान सरासरी किंवा त्यापेक्षा कमी राहणार आहे.

पुण्यात आज आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तर दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. उष्णतामान वाढण्याची शक्यता असल्याने आवश्यक काम असेल तरच घरा बाहेर पडावे. बाहेर पडताना पाणी पिऊनच बाहेर पडा. पाण्याची बाटली जवळ बाळगा, काम झाल्यानंतर सावलीत थोडावेळ विश्रांती घेऊन मग पाणी द्या असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

IPL_Entry_Point

विभाग