मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  UPSC CSE Result 2022: यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील १५ उमेदवारांनी मारली बाजी, पाहा संपूर्ण यादी

UPSC CSE Result 2022: यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील १५ उमेदवारांनी मारली बाजी, पाहा संपूर्ण यादी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 23, 2023 08:23 PM IST

Kashmira Sankhye: यूपीएससी परीक्षेत डॉ. कश्मिरा संखे महाराष्ट्रातून पहिली आली.

Kashmira Sankhye
Kashmira Sankhye

UPSC Exam 2022 Result: केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२२ चा अंतिम निकाल मंगळवा (२३ मे २०२३) दुपारी जाहीर केला. त्यात इशिता किशोरने देशात पहिला क्रमांक मिळवला असून ठाण्याची डॉ. कश्मिरा संखे (देशात २५वी) महाराष्ट्रात पहिली आली आहे. कश्मिराने यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. कश्मिरासह महाराष्ट्रातील १५ उमेदवारांनी यूपीएससी परीक्षा उतीर्ण केली आहे, त्यांची नावे जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

यूपीएससी सीएसई प्राथमिक परीक्षा ५ जून २०२२ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल २२ जून २०२२ ला जाहीर करण्यात आला. त्यानंतर १६ ते २५ सप्टेंबर दरम्यान मुख्य परीक्षा घेण्यात आली होती, ज्याचा निकाल ६ डिसेंबरला जाहीर करण्यात आला होता. या परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांच्या १८ मे रोजी मुलाखत संपल्या. त्यानंतर आज या परीक्षेत अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.

महाराष्ट्रातील यशस्वी १५ उमेदवारांची यादी

१) कश्मिरा संखे: ऑल इंडिया रँकिंग २५

२) वसंत दाभोळकर: ऑल इंडिया रँकिंग- ७६

३) प्रतिक जराड:  ऑल इंडिया रँकिंग- १२२

४) जान्हवी साठे: ऑल इंडिया रँकिंग- १२७

५) गौरव कायंदे पाटील: ऑल इंडिया रँकिंग- १४६

६) ऋषिकेश शिंदे: ऑल इंडिया रँकिंग- १८३

७) अमर राऊत: ऑल इंडिया रँकिंग- २७७

८) अभिषेक दुधाळ: ऑल इंडिया रँकिंग- २७८

९) श्रुतिषा पाताडे: ऑल इंडिया रँकिंग- २८१

१०) स्वप्नील पवार: ऑल इंडिया रँकिंग- २८७

११) अनिकेत हिरडे: ऑल इंडिया रँकिंग- ३४९

१२) संकेत गरुड: ऑल इंडिया रँकिंग- ३७०

१३) ओमकार गुंडगे: ऑल इंडिया रँकिंग- ३८०

१४) परमानंद दराडे: ऑल इंडिया रँकिंग- ३९३

१५) मंगेश खिलारी: ऑल इंडिया रँकिंग- ३९३

यंदाच्या यूपीएससी परीक्षेत मुलींचा दबदबा पाहायला मिळाला. पहिल्या चारमध्ये मुलींचाच समावेश आहे. इशिता किशोर देशात पहिली आली आहे. त्यानंतर गरिमा लोहिया दुसरी, उमा हरठी एन तिसरी आणि स्मृती मिश्रा देशात चौथी आली आहे.

IPL_Entry_Point

विभाग