मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Blast Threat Call: ट्विटर वरून बॉम्ब हल्ल्याची धमकी देणं भोवलं ! आरोपी तरुणाला नांदेडमधून अटक

Mumbai Blast Threat Call: ट्विटर वरून बॉम्ब हल्ल्याची धमकी देणं भोवलं ! आरोपी तरुणाला नांदेडमधून अटक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 24, 2023 07:23 AM IST

Mumbai Blast Threat Call: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली जात आहे. मंगळवारी ट्विटरच्या माध्यमातून बॉम्बहल्ल्याची धमकी देणाऱ्या तरुणाला मुंबई पोलिसांनी नांदेडमधून अटक केली.

Mumbai Blast Threat Call
Mumbai Blast Threat Call (HT_PRINT)

नांदेड: 'मुंबईत मी मुंबईत बॉम्बस्फोट करणार आहे' असे लिहत मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅन्डलला टॅग करत मंगळवारी हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. ही धमकी देणाऱ्या तरुणाला मुंबई पोलिसांनी मध्यरात्री नांदेडमधून अटक केली आहे.

श्रीपाद गोरठकर असे धमकी देणाऱ्या माथेफिरू तरुणाचे नाव आहे. तो मूळचा नायगाव तालुक्यातील नावंदी येथील राहणारा आहे. तो नांदेड येथे शिक्षण घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुंबईत बॉम्बस्फोट करण्यात येणार आहे अशी धमकी दिली जात आहे. दोन दिवसांपूर्वी एकाने पोलिसांना फोन करून २६/११ सारख्या हल्ला करण्याची धमकी दिली होती. ही घटना ताजी असतांना सोमवारी मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅन्डलला टॅग करत बॉम्बहल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती.

आरोपीने हा मेसेज इंग्रजीत लिहिला होता. 'I M Gonna Blast The Mumbai Very Soon' असे ट्विटरवर लिहिण्यात आले होते. पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. हा मेसेज कुणी पाठवला, तसेच कोठून आला या बाबत चौकशी सुरू करण्यात आली होती. मुंबईच्या सीआययू युनिटने तात्काळ कारवाई करत मॅसेज पाठवणाऱ्या तरुणाचा शोध घेतला. तपासात हा तरुण जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नावंदी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली.

मुंबई पोलिसांनी तात्काळ नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना याबाबत माहिती दिली. सोमवारी रात्री २ वाजता मुंबई क्राईम ब्रँचने नायगाव पोलिसांच्या मदतीने या तरुणाला त्याच्या घरून अटक केली. त्याची प्राथमिक चौकशी करून त्याला मुंबईत आणण्यात आले आहे.

IPL_Entry_Point

विभाग