मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Blast Threat Call: मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी; धमकीसाठी ट्विटरचा वापर, सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

Mumbai Blast Threat Call: मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी; धमकीसाठी ट्विटरचा वापर, सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 23, 2023 11:14 AM IST

Mumbai Blast Threat Call: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली जात आहे. आता पुन्हा ट्विटरच्या माध्यमातून एका माथेफिरुने बॉम्बहल्ल्याची धमकी दिल्याचे उघड झाले आहे.

Mumbai: Police
Mumbai: Police (PTI)

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुंबईत बॉम्बस्फोट करण्यात येणार आहे अशी धमकी दिली जात आहे. दोन दिवसांपूर्वी एकाने पोलिसांना फोन करून २६/११ सारख्या हल्ला करण्याची धमकी दिल्याची घटना ताजी असतांना आता पुन्हा मुंबईत बॉम्बहल्ला करण्याची धमकी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांना 'मी मुंबईत बॉम्बस्फोट करणार आहे' अशी ट्विटरद्वारे धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवर 'मी लवकरच मुंबईत स्फोट घडवणार आहे' असा मेसेज एकाने पाठवला होता.

हा मेसेज इंग्रजीत पाठवण्यात आला होता. त्यात 'I M Gonna Blast The Mumbai Very Soon' असे लिहिण्यात आले होते. पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. हा मेसेज कुणी पाठवला, तसेच कोठून आला या बाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मुंबईला आतापर्यंत अनेकदा बॉम्बहल्ल्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. या धमक्या फोनवरून किंवा ईमेलच्या साह्याने दिल्या गेल्या आहेत. मात्र, पहिल्यांदाच ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना धमकी मिळाली आहे. ज्या व्यक्तीने हा धमकीचा मेसेज केला आहे. त्याच्या आयपी अॅड्रेसवरून शोध सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी सर्व यंत्रणांना हाय अलर्ट मोडवर ठेवले आहे.

IPL_Entry_Point

विभाग