मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : पंतप्रधान पदाबाबत शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले 'मी शर्यतीत..'

Sharad Pawar : पंतप्रधान पदाबाबत शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले 'मी शर्यतीत..'

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 23, 2023 10:29 AM IST

Sharad Pawar news : देशात भाजपविरोधी विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. यात शरद पवार यांची भूमिका महत्वाची आहे. यामुळे पंतप्रधान पदाबाबत शरद पवार हे कायम दावेदार राहिले आहे. मात्र, या बाबत त्यांनी सोमवारी एका कार्यक्रमात मोठे विधान केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar (ANI)

पुणे: देशात भाजपविरोधी विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. यात शरद पवार यांची भूमिका महत्वाची आहे. यामुळे पंतप्रधान पदाबाबत  शरद पवार हे कायम दावेदार राहिले आहे. मात्र, या पदाबाबत त्यांनी सोमवारी एका कार्यक्रमात मोठे विधान केले. पवार म्हणाले, मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही. मात्र शरद पवार यांच्या वयाप्रमाणे, असा शब्द कधी माझ्याबाबत उच्चारू नका, असे पवारांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरात कुलगुरू राम ताकवले यांच्या शोक सभेच्या कार्यक्रमासाठी शरद पवार सोमवारी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविच प्रश्नांना उत्तरे दिली. पंतप्रधान पदाच्या दाव्यासंदर्भात शरद पवार यांना विचारले असता पवार म्हणाले, अजिबात नाही. आम्हला या देशात स्थिर आणि विकासाला प्रोत्साहित करणार नेतृत्व हवे आहे, उद्या जनतेने उत्तम प्रकारची साथ दिली, शक्ती दिली तर आम्ही मार्ग काढू. माझ्या सारख्याची जबाबदारी आहे की, त्याना साथ देणे, शक्ती देणे आणि ते मागतील तिथे मदत देणे हे माझे काम आहे असे ते म्हणाले.

दोन हजारांच्या नोट बंदीवर देखील शरद पवार यांनी भाष्य केले. पवार म्हणाले, निर्णय घ्यायचे आणि त्यानंतर त्याचं दायित्व स्वीकारायचं नाही, हे चुकीचं आहे. निर्णय घेतल्यानंतर ज्यांची गुंतवणूक आहे, त्यांना बदल करून देण्याची जबाबदारी स्वीकारली जात नाही, हे यापूर्वीच्या नोटबंदीच्या निर्णयावरून दिसून आलं आहे. एखाद्या लहरी माणासाने निर्णय घ्यावा, असा हा प्रकार आहे.

 

जागा वाटपासंदर्भात बोलतांना पवार म्हणाले, महाविकास आघाडीत जागा वाटपासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. आगामी निवडणुका एकत्रित लढविण्याचे निश्चित झालं आहे. तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन-दोन सदस्य जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार आहेत. त्यात काही अडचणी निर्माण झाल्यास उद्धव ठाकरे, मी आणि मल्लिकार्जुन खरगे चर्चा करणार आहोत. महाविकास आगाडीत मतभेत नाहीत. आघाडीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष कोण आणि दुसऱ्या क्रमांकाचा कोण, याला महत्त्व नाही. तर सगळेच पक्ष महत्त्वाचे आहेत, असे देखील पवार म्हणाले.

IPL_Entry_Point

विभाग