मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sai Varshith Kandula : व्हाईट हाऊस समोर ट्रक धडकवणाऱ्या आरोपीची ओळख पटली; जो बायडन यांची करायची होती हत्या

Sai Varshith Kandula : व्हाईट हाऊस समोर ट्रक धडकवणाऱ्या आरोपीची ओळख पटली; जो बायडन यांची करायची होती हत्या

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 24, 2023 08:28 AM IST

White House truck crash : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची हत्या करण्याच्या उद्दिष्टाने व्हाईट हाऊस समोर ट्रक धडवणाऱ्या १९ वर्षीय तरुणाची ओळख पातळी आहे. साई वर्षित कंदुला असे त्याचे नाव असून तो अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील रहिवाशी आहे.

Sai Varshith Kandula
Sai Varshith Kandula

White House truck crash : सोमवारी रात्री एका १९ वर्षीय तरुणाने वॉशिंग्टन डीसी मधील लाफायेट पार्कच्या बाहेर व्हाईट हाऊस समोर असलेल्या सुरक्षा बरिकेटला एक ट्रक धडकवला होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. १९ वर्षीय ट्रक चालक तरुणाची ओळख पटली असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना जीवे मारण्याच्या हेतूने त्याने हे कृत्य केल्याचे तपासात पुढे आले आहे. हिटलरच्या नाझी विचारांनी हा तरुण प्रेरित असून त्याच्या ट्रकमध्ये नाझी जर्मनीचा झेंडा देखील सापडला आहे. साई वर्षित कंदुला असे त्याचे नाव असून तो अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील रहिवासी आहे.

सोमवारी रात्री वॉशिंगटन येथे व्हाईट हाऊस समोर एका तरुणाने ट्रक चालवत हा ट्रक व्हाईट हाऊसवर धडकवण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. त्यांनी तातडीने ट्रक चालक तरुणाला अटक केली. या तरुणाने वॉशिंग्टन डीसी मधील लाफायेट पार्कच्या बाहेर व्हाईट हाऊसपुढे लावण्यात आलेल्या बॅरिकेट्सला यू-हॉल नामक ट्रक धडकवला. या घटनेची तातडीने सुरक्षा यंत्रणांनी दखल घेतली. या घटनेची माहिती काही वेळात युनायटेड स्टेट्स सिक्रेट सर्व्हिस चीफ ऑफ कम्युनिकेशन्स, अँथनी गुग्लिएल्मी यांनी जारी केली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचेही त्यांनी जारी ट्विटरद्वारे दिलेल्या निवेदनात माहिती दिली.

या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आल्याचे देखील त्यांनी म्हटले. दरम्यान, ट्रकची तपासणी केली असता त्यात नाझी जर्मनीचा ध्वज आढळला. आरोपीची चौकशी केली असता त्याने धक्कादायक खुलासे केले. साई वर्शीथ कंदुला याने यू-हॉल नामक ट्रक भाड्याने घेत तो जाणीव पूर्वक व्हाईट हाऊसजवळील सुरक्षा अडथळ्याला धडकवला. त्याला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना मारून सत्ता हस्तगत करायची होती.

या नंतर तपास केला असता, साई वर्शीथ कंदुला हा मिसुरी येथील रहिवाशी असल्याचे आढळले आहे. त्याने सेंट लुईस ते ड्युलेस आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत प्रवास केला. या ठिकाणी त्याने U-Haul ट्रक भाड्याने घेतला. यानंतर कंदुला हा व्हाईट हाऊसच्या दिशेने निघाला. सोमवारी रात्री १० वाजता लाफायेट स्क्वेअरच्या उत्तरेकडील सुरक्षा अडथळ्यात त्याने हा ट्रक धडकवला. यानंतर त्याने ट्रकमधून बाहेर पडत नाझी झेंडा फडवकला. या युवकाला पार्क पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. वाहनाची तपासणी केली असता त्यात डक्ट टेप आणि नाझी ध्वज सापडला. ट्रकमध्ये कोणतीही शस्त्रे नव्हती.

युनायटेड स्टेट्स पार्क पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, कंडुलावर धोकादायक शस्त्राने हल्ला करणे, मोटार वाहनाचे बेपर्वा चालवणे, जिवे मारण्याची धमकी देणे, अपहरण करणे, राष्ट्रपती, उपाध्यक्ष किंवा कुटुंबातील सदस्यांना इजा पोहोचवणे, त्यांचा नाश करणे असे आरोप ठेवण्यात आले आहे.

कोण आहे साई वर्षित कंदुला ?

व्हाईट हाऊसवर ट्रक धडवणारा साई वर्षित कंदुलाहा हा चेस्टरफील्ड, मिसूरी येथील सेंट लुईस उपनगरातील रहिवाशी आहे. तो एक अमेरिकन नागरिक आहे. साई वर्षित कंदुला याने २०२२ मध्ये मार्क्वेट सीनियर हायस्कूलमधून पदवीधर झाला आहे. त्याला डेटा अॅनालिटिक्समध्ये करिअर करायचे होते. या साठी त्याने पाच वर्षे प्रोग्रामिंग कोर्स केला असून कोडिंग भाषांमध्ये प्रवीण असल्याचे त्याच्या लिंकडीन प्रोफाइलवर लिहिले आहे. त्याला या या क्षेत्रात नोकरी कार्याची होती. मात्र, त्याला कुठलाच अनुभव नव्हता. तो हिटलरच्या विचारांनी प्रेरित असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

IPL_Entry_Point

विभाग