मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : घरातून जा म्हटल्याने चिडलेल्या घरजावयाने मारहाण करून सासूचे पाडले दात

Pune Crime : घरातून जा म्हटल्याने चिडलेल्या घरजावयाने मारहाण करून सासूचे पाडले दात

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 24, 2023 06:54 AM IST

Pune Crime : पुण्यात एका घर जावयाला घरातून निघून जा म्हणून सांगितल्याने चिडलेल्या जावयाने सासुला मरण करत तिचे दात पाडले.

Pune Crime
Pune Crime (HT_PRINT)

पुणे: पुण्यात घरजावायला घरात राहू नको, असे सांगितल्याने चिडलेल्या जावयाने सासूच्या धावून जात तिच्या अंगावर गरम पाणी फेकून तिला जबर मारहाण केली. एवढेच नाही तर सासूचे डोके फरशीवर आपटून तिचे दात पाडले. ही घटना पुण्यातील खडकी परिसरात घडली. पोलिसांनी आरोपी घरजावयाला अटक केली.

ट्रेंडिंग न्यूज

सुजाता कैलास शिंदे (वय ५०) असे जखमी झालेल्या सासूचे नाव आहे. त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. महेंद्र सिद्धनाथ तोरणे (वय २५, रा. आर्मी क्वार्टर, सर्वत्र विहार, मुळा रस्ता, खडकी) असे आरोपी जावयाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत सासू सुजाता शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुजाता शिंदे खडकीतील दारूगोळा कारखान्यात कामाला आहेत. शिंदे यांची मुलगी आणि जावई तोरणे त्यांच्याकडे राहायला आहे. जावई तोरणे याच्याशी त्यांचा वाद झाला. यामुळे शिंदे यांनी जावयाला घरात राहू नको, असे सांगितले.

यामुळे चिडलेल्या तोरणेने सासूच्या अंगावर गरम पाणी ओतले. सासूचे डोके फरशीवर आपटले. त्यांना जबर मरण केली. यात सासूचे दोन दात तुटले. सासू सुजाता शिंदे यांच्या चेहऱ्यावर गरम पाणी फेकल्याने त्या भाजल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस उपनिरीक्षक बेंदगुडे तपास करत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग