मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shevgaon Voilence : शेवगावमधील मिरवणुकीत तुफान दगडफेक, वाहनांची जाळपोळ, पोलिसांचा लाठीचार्ज

Shevgaon Voilence : शेवगावमधील मिरवणुकीत तुफान दगडफेक, वाहनांची जाळपोळ, पोलिसांचा लाठीचार्ज

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 15, 2023 08:51 AM IST

Shevgaon Voilence News : किरकोळ कारणावरून शेवगावात मध्यरात्री दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.

Shevgaon Ahmednagar Voilence News
Shevgaon Ahmednagar Voilence News (HT)

Shevgaon Ahmednagar Voilence News : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या मिरवणुकीत दोन गटात तुफान राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील मुख्य चौकात झालेल्या हाणामारीत दोन पोलीस जखमी झाले असून शेकडो वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर हाणामारी तसेच दगडफेक केल्याचा आरोप करत जोरदार धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं मध्यरात्री शेवगावात पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थिती नियंत्रणात आणली. दोन गटात झालेल्या दगडफेकीमुळं शेवगावात तणावजन्य परिस्थीती निर्माण झाली होती. त्यानंतर आता पोलिसांनी तब्बल १०२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दोन गटात झालेल्या राड्यामुळं चार पोलीस आणि अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहे. आणखी वाद वाढू नये, यासाठी पोलिसांनी शेवगावात राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात केल्या आहे. त्यानंतर पोलिसांनी तब्बल १०२ जणांवर गुन्हा दाखल करत त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. पोलिसांनी शहरात दगडफेक करणाऱ्या आरोपींची धरपकड सुरू केली असून शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगर आणि अकोल्यात दोन गटात मोठा हिंसाचार झाला होता. त्यानंतर आता शेवगावात राडा झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील धार्मिक स्थळांवर दगडफेक झाल्याचा आरोप करत शेवगावातील एका गटाने मिरवणुकीत दगडफेक करण्यास सुरुवात केली. दोन गटात राडा झाल्यानंतर जमावाने दुकानं आणि वाहनांची जाळपोळ केली. त्यानंतर हिंसाचाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दोन गटात झालेल्या राड्यात चार पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. तसेच अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली आहे.

IPL_Entry_Point