मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Marathi News Updates 15 May 2023 Maharashtra Breaking News Live Updates Today

Live News Updates 15 May 2023(HT)

Live News Updates 15 May 2023 : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांना दुसऱ्यांना ईडीचं समन्स, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

Live News Updates 15 May 2023 : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना येत्या २२ मे रोजी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Mon, 15 May 202303:06 PM IST

पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना हटवण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे धरणे आंदोलन

पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांनी इम्रान खान यांना जामीन दिला होता. यानंतर पाकिस्तान सरकारने त्यांच्या विरोधात निषेधाचा प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात नॅशनल असेंब्लीने एक ठराव संमत केला आहे, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना हटवण्यासाठी पाच सदस्यीय समितीची मागणी करण्यात आली आहे.

Mon, 15 May 202310:49 AM IST

ठाकरे गटाच्या ‘त्या’ मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीनं मुंबईत दाखल

शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय तातडीने घ्यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे केल्यानंतर लंडन दौऱ्यावर असणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अखेर मुंबईत तातडीने दाखल झाले आहेत. 

Mon, 15 May 202310:36 AM IST

Closing bell : सलग दुसऱ्या दिवशी तेजी कायम, सेन्सेक्स निफ्टीत वाढ

आठवड्याच्या पहिल्या सत्रात सेन्सेक्स निफ्टीने चांगलीच मुसंडी मारली आहे. सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीत बंद झाले. सेन्सेक्स ३१७ अंकांच्या वाढीसह ६२,३४५ अंशांवर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टीही ८४ अंकांनी वाढून १८,३९८ अंशांवर बंद झाला.

आज बाजारात ऑटो शेअर्स तेजीत होते. चांगला निकाल लागल्याने टाटा मोटर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. शेअर जवळपास ३ टक्क्यांनी वाढला. त्याचप्रमाणे हिरो मोटोकॉर्पचा शेअरही ३ टक्क्यांनी वधारला. सर्वोच्च न्यायालयात हिंडनबर्ग प्रकरणाच्या सुनावणीमुळे अदानी समूहाचे शेअर्समध्ये नरमाईचे वातावरण होते. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स २ टक्क्यांनी घसरले. याआधी शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स ११७ अंकांनी वाढून ६२,०२१ वर तर निफ्टी १४ अंकांच्या वाढीसह १८,३११ अंशावर बंद झाला होता.

Mon, 15 May 202310:30 AM IST

Kotak :  कोटकतर्फे नवी वित्तीय योजना सादर

कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने आज एका पूर्णपणे नवीन प्रिव्ही लीग कार्यक्रमाची घोषणा केली. हा एक अनन्य, अव्वल दर्जाचा बँकिंग कार्यक्रम असून, यात अनन्यसाधारण जीवनशैलीविषयक लाभांचा तसेच उच्च पतधारक (एचएनडब्ल्यू) व्यक्तींसाठी खास विकसित करण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वित्तीय उत्पादनांचा समावेश आहे.

Mon, 15 May 202309:09 AM IST

Finance :  फायनान्स फ्रंटियर्स कॉन्क्लेव्हचे आयोजन

झेल एज्युकेशन या भारतातील अग्रगण्य फायनान्स व अकाऊंट्स एड-टेकने नुकतेच फायनान्स फ्रंटियर्स कॉन्क्लेव्ह २०२३ च्या पहिल्या पर्वाचे आयोजन केले. या कॉन्क्लेव्हने उद्योग प्रमुखांचे नेतृत्व असलेला सर्वोत्तम समुदाय तयार करण्याची विशेष संधी दिली. या कार्यक्रमात प्रमुख भाषण, पॅनेल चर्चा, प्रश्नोत्तरे आणि नेटवर्किंग सत्रे अशा अनेक सत्रांचे आयोजन करण्यात आले. झेल एज्युकेशन आणि नॉलेज पार्टनर ईवायचा विशेष कार्यक्रम फायनान्स अॅण्ड अकाऊंटिंगमध्ये आपले करिअर घडवण्याचे नियोजन करत असलेल्या विद्यार्थ्‍यांसाठी डिझाइन करण्यात आला होता आणि उद्योग प्रमुखांसह गेम-चेंजिंग माहिती व नेटवर्किंग संधींवर लक्ष केंद्रित केले. १५० हून अधिक विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Mon, 15 May 202306:55 AM IST

Tata Motors :  टाटा मोटर्सचा शेअर्स उच्चांकी पातळीवर 

टाटा समूहातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये सोमवारी चार टक्क्यांपर्यंत उसळी पाहायला मिळाली. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या चौथ्या तिमाहीतील मजबूत निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात टाटा मोटर्सचे शेअर्स वधारले. कंपनीच्या शेअर्सनी ५३७.१५ रुपयांची ५२ आठवड्यातील उच्चांकी पातळी गाठली आहे.

Mon, 15 May 202306:24 AM IST

Jayant Patil ED Notice : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांना दुसऱ्यांना ईडीचं समन्स, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

Jayant Patil ED Notice : आयएल आणि एफएस कंपनीतील आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणावरून ईडीने आज पुन्हा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना समन्स बजावलं आहे. तसेच येत्या २२ मे रोजी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Mon, 15 May 202302:42 AM IST

नौदलाकडून ‘ब्राह्मोस’ची यशस्वी चाचणी

भारतीय नौदलाने लांब पल्ल्यापर्यंत मारा करणाऱ्या ब्राह्मोस या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. युद्धनौका ‘आयएनएस मुरगाव’ वरून ही चाचणी करण्यात आली आहे.

Mon, 15 May 202302:15 AM IST

Petrol diesel price : वर्षभरात पेट्रोल डिझेलचे दर जैसे थे 

सोमवार १५ मे साठी देखील OMC ने वेबसाईटवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट केल्या आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तेल विपणन कंपन्यांनी २२ मे रोजी पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केली होती. गेल्या वर्षापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Mon, 15 May 202312:58 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यातील तापमानाचा पारा वाढणार, हवामान खात्याचा इशारा

Maharashtra Weather Update : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नाशिक, अकोला, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तापमानाने उच्चांक नोंदवला आहे. त्यामुळं आता नागरिकांना उष्णतेपासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.

Mon, 15 May 202312:55 AM IST

Karnataka New CM : सिद्धरामय्या की डीके शिवकुमार, कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण?

Karnataka New CM : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने बहुमत मिळवल्यानंतर आता आज नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. बंगळुरुत काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे, त्यात मल्लिकार्जुन खर्गे हे नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करतील.