मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Naxal Encounter Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई! सुरक्षा दल व नक्षलवाद्यांच्या चकमकीत ६ माओवादी ठार

Naxal Encounter Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई! सुरक्षा दल व नक्षलवाद्यांच्या चकमकीत ६ माओवादी ठार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 27, 2024 12:36 PM IST

Naxal encounter in chhattisgarh : छत्तीसगडमधील विजापूरमध्ये जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून यात ६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

छत्तीसगडमधील विजापूरमध्ये जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून यात ६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
छत्तीसगडमधील विजापूरमध्ये जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून यात ६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

Naxal encounter in chhattisgarh : लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्तीसगडमधील विजापूरमध्ये सुरक्षादलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली असून या चकमकीत जवानांनी केलेल्या गोळीबारात ६ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे. या बाबत एसपी जितेंद्र कुमार यादव यांनी माहिती दिली आहे.

Prakash Ambedkar news : महाविकास आघाडीला धक्का! प्रकाश आंबेडकर यांची स्वबळावर लढण्याची घोषणा, जरांगे पाटलांची साथ घेणार

छत्तीसगडमधील बिजापूर येथील बासागुडा पोलीस स्टेशन परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली आहे. कोब्रा २१०, २०५, सीआरपीएफची २२९ वी बटालियन आणि डीआरजी यांचा समावेश असलेल्या सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. जवानांनी जंगलात लपलेल्या नक्षलवाद्यांना घेरुन जोरदार गोळीबार केला. जवानांनी केलेल्या गोळीबारात ६ नक्षलवादी ठार झाले. या चकमकीनंतर बासागुडाच्या जंगलात शोध घेत असताना जवानांनी नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. होळीच्या दिवशी या भागात नक्षलवाद्यांनी ३ ग्रामस्थांची हत्या केली होती.

Alephata leopard news : पुण्यातील आळेफाटा येथे थरार! बिबट्या थेट रुग्णालयात घुसला; वनरक्षकासह ३ जखमी

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील बासागुडा भागात होळीच्या दिवशी तीन गावकऱ्यांवर अज्ञातांनी कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली होती. या हत्याकांडामागे नक्षलवादी असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. दुपारी गावात घुसल्यानंतर तिघांवर अज्ञातांनी हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यापैकी दोन ग्रामस्थांचा जागीच मृत्यू झाला. एका गावकऱ्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी या गावकऱ्यांवर एकामागून एक कुऱ्हाडीने अनेक वेळा हल्ला केला. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे चंद्रया मोदियम, अशोक भंडारी आणि करम रमेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

IPL_Entry_Point