Prakash Ambedkar news : महाविकास आघाडीला धक्का! प्रकाश आंबेडकर यांची स्वबळावर लढण्याची घोषणा, जरांगे पाटलांची साथ घेणार
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Prakash Ambedkar news : महाविकास आघाडीला धक्का! प्रकाश आंबेडकर यांची स्वबळावर लढण्याची घोषणा, जरांगे पाटलांची साथ घेणार

Prakash Ambedkar news : महाविकास आघाडीला धक्का! प्रकाश आंबेडकर यांची स्वबळावर लढण्याची घोषणा, जरांगे पाटलांची साथ घेणार

Mar 27, 2024 11:43 AM IST

Prakash Ambedkar on Lok Sabha Election : प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

प्रकाश आंबेडकर यांची नव्या आघाडीची घोषणा, जरांगे पाटलांची साथ घेणार
प्रकाश आंबेडकर यांची नव्या आघाडीची घोषणा, जरांगे पाटलांची साथ घेणार

Vanchit Bahujan Aghadi news : वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेससह मित्रपक्षांच्या नेत्यांना प्रकाश आंबेडकर यांनी मोठा धक्का दिला आहे. आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना सोबत घेऊन ताकदीनं निवडणुकीत उतरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

अकोला इथं पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ही घोषणा केली. येत्या लोकसभा निवडणुकीत विविध समाजाला प्रतिनिधित्व देण्यात येणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

अकोल्यातून प्रकाश आंबेडकर लढणार!

महाविकास आघाडीपासून अंतर राखण्याची घोषणा करताना प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पक्षाच्या काही उमेदवारांच्या नावांची घोषणाही केली. प्रकाश आंबेडकर हे स्वत: अकोला मतदारसंघातून लढणार आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सांगलीत प्रकाश शेंडगे हे उभे राहिल्यास त्यांना पाठिंबा दिला जाईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

महाविकास आघाडी, भाजपवर आरोप

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हा फॅक्टर लक्षात घ्यावा अशी विनंती आम्ही महाविकास आघाडीला केली होती. मात्र, आमच्या म्हणण्याकडं दुर्लक्ष करण्यात आलं, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. 

'भाजपनं मुस्लिमांना एकटं पाडण्याचं राजकारण सुरू केलं आहे. त्याला उत्तर म्हणून आम्ही लोकसभा निवडणुकीत मुस्लिम उमेदवारही उतरवणार आहोत. त्याचबरोबर जैन समाजाचे उमेदवारही उतरवणार आहोत. केवळ उमेदवार निवडणुकीत उतरवणार नाही, तर त्यांना निवडून आणणार, असा निर्धारही आंबेडकर यांनी व्यक्त केला.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पुढीलप्रमाणे

भंडारा-गोंदिया - संजय गजानन केवट

गडचिरोली-चिमूर - हितेश पांडुरंग मढावी

चंद्रपूर - राजेश बेले

बुलढाणा - वसंत राजाराम मगर

अकोला - प्रकाश आंबेडकर

अमरावती - कुमारी प्राजक्ता तारकेश्वर टिल्लेवार

वर्धा - प्रा. राजेंद्र साळुंखे

यवतमाळ वाशिम - खिमसिंग प्रतापराव पवार

नागपूर - काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा

सांगली - प्रकाश शेंडगे उभे राहिल्यास पाठिंबा

Whats_app_banner