मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Assembly Session : चंद्रकांत पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यावर फडणवीसांचं रोखठोक उत्तर, म्हणाले…

Assembly Session : चंद्रकांत पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यावर फडणवीसांचं रोखठोक उत्तर, म्हणाले…

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 21, 2022 02:51 PM IST

Maharashtra Assembly Session : मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis Maharashtra Assembly Session Nagpur
Devendra Fadnavis Maharashtra Assembly Session Nagpur (HT)

Devendra Fadnavis Maharashtra Assembly Session Nagpur : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आणि जोतिराव फुले यांनी भीक मागून शाळा चालवल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करताना पुण्यात आंबेडकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानं चंद्रकांत पाटलांवर शाईफेक केली होती. यावेळी विरोधकांकडून चंद्रकांत पाटलांवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय फडणवीसांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचाही दाखला दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

विधानसभेत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचं मी समर्थन करत नाहीये. परंतु प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनगाथेत भीक मागण्याचा अर्थ काय आहे?, त्याचा संदर्भही आपण तपासायला हवा, असं म्हणत फडणवीसांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं सांगत अप्रत्यक्ष त्यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे. चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी थेट हिवाळी अधिवेशनात स्पष्टीकरण दिल्यानं अनेकांचा भूवया उंचावल्या आहेत.

विरोधानंतर चंद्रकांत पाटलांची माफी...

महापुरुषांच्या योगदानाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं होतं की, महापुरुषांच्या महान कार्याबाबत मला नितांत आदर आहे. त्यांच्याबाबत बोलताना माझ्याकडून बोली भाषेत अनावधानानं काही शब्द निघाले. कुणालाही दुखावण्याचा हेतू माझा नव्हता, त्यामुळं कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं होतं.

IPL_Entry_Point