मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur : अजित पवारांनी चीनचं उदाहरण देत लॉकडाऊनचा विषय काढला अन् फडणवीसांनी केली महत्त्वपूर्ण घोषणा

Nagpur : अजित पवारांनी चीनचं उदाहरण देत लॉकडाऊनचा विषय काढला अन् फडणवीसांनी केली महत्त्वपूर्ण घोषणा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 21, 2022 02:21 PM IST

Ajit Pawar vs Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यानं तिथं टाळेबंदी लावण्यात आली आहे. त्यानंतर आता भारतातही महामारीबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना केद्रानं केल्या आहेत.

Ajit Pawar vs Devendra Fadnavis In Maharashtra Assembly Session Nagpur
Ajit Pawar vs Devendra Fadnavis In Maharashtra Assembly Session Nagpur (HT)

Ajit Pawar vs Devendra Fadnavis In Maharashtra Assembly Session Nagpur : गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये सातत्यानं कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळं चीनी सरकारनं पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता संपूर्ण जगात कोरोना महामारीबाबत खबरदारी आणि उपाययोजना केल्या जात असतानाच आता विरोधी पक्षनेते अजित पवारांनी नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात कोरोना महामारीचा मुद्दा उपस्थित करत सरकार काय उपाययोजना करत असल्याची माहिती घेतली आणि त्यानंतर लगोलग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, कोरोनाच्या काळात मार्च महिन्यात विदेशातून आलेल्या लोकांमुळं महाराष्ट्रात या विषाणूचा संसर्ग वाढला. त्यामुळं आता इतर देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत असल्यानं अभ्यास करण्यासाठी आपण समिती नेमणार आहात का?, कोरोना पसरू नये म्हणून लॉकडाऊन लावणार आहात का?, शिंदे-फडणवीस सरकार कोरोनाबाबत कोणत्या उपाययोजना करणार आहे?, असा सवाल करत अजित पवारांनी सरकारला सवाल विचारला. त्यानंतर विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या प्रश्नांना उत्तर देताना कोरोना महामारीबाबत उपाययोजना करण्यासाठी टास्क फोर्स किंवा एक समिती गठीत करणार असल्याची घोषणा केली. त्यासाठी केंद्रातील मोदी सरकारशी समन्वय साधण्यात येणार असून बदलत असलेल्या स्थितीवर सरकार लक्ष ठेवून असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी अजित पवारांच्या प्रश्नांना उत्तर दिलं.

त्यानंतर कोरोनाच्या नव्या व्हायरसचा महाराष्ट्रात प्रसार होऊ नये, यासाठी सर्वांनी एकत्र येत काळजी घेण्याची गरज असल्याचं अजित पवार म्हणाले. याशिवाय कोरोना काळात कोणती यंत्रणा तात्काळ उभी करायची, याचा अनुभव प्रशासनाला आहे. त्यामुळं स्थिती बदलली तर आवश्यक उपाययोजना तात्काळ करायला हव्यात, अशी मागणीही अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली.

IPL_Entry_Point