मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Assembly Session: राज्यात डॉक्टर-तंत्रज्ञांच्या चार हजार जागांची भरती होणार; विधानसभेत सरकारची घोषणा

Assembly Session: राज्यात डॉक्टर-तंत्रज्ञांच्या चार हजार जागांची भरती होणार; विधानसभेत सरकारची घोषणा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 21, 2022 01:48 PM IST

Maharashtra Assembly Session Nagpur : राज्यात लवकरच डॉक्टर, तंत्रज्ञांच्या चार हजार जागांची पदभरती करणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजनांनी विधानसभेत दिली आहे.

Maharashtra Assembly Session Nagpur
Maharashtra Assembly Session Nagpur (Deepak Salvi)

Maharashtra Assembly Session Nagpur : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारला बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी घेरलेलं असतानाच आता राज्य सरकार लवकरच डॉक्टर्स आणि तंत्रज्ञांच्या साडेचार हजार जागांची पदभरती करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळं टीसीएसच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया पार पडणार असून यातून अनेक उच्चशिक्षितांना नोकरी मिळणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनात दिली आहे. वैद्यकीय क्षेत्रात रिक्त असलेल्या जागांवरून विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता नवीन पदभरती काढण्याची घोषणा करत शिंदे-फडणवीसांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

डॉक्टर आणि तंत्रज्ञांची पदभरती करताना वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन विधानसभेत बोलताना म्हणाले की, एमपीएससीच्या माध्यमातून ३०० डॉक्टरांची पदभरती करण्यात आली असून अद्यापही २८ टक्के पदं रिक्त आहेत. याबाबत सरकारकडून लवकरच एक मेडिकल बोर्ड तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर डॉक्टर आणि तंत्रज्ञांच्या चार हजारांहून अधिक जागांवर पदभरती होणार असल्याची घोषणा महाजन यांनी केली आहे. आतापर्यंत राज्यातील १० टक्के रुग्णालयांत ९० टक्के हाफकिनची औषधं खरेदी होत होती. परंतु आता हे प्रमाणही आम्ही बदलणार असल्याचं मंत्री महाजन म्हणाले.

महाराष्ट्रातील नागपूर, औरंगाबाद, पुणे आणि मुंबई या शहरांमध्ये राज्यासह देशातील वेगवेगळ्या भागातील रुग्णांची संख्या मोठी असते. त्यामुळं एखाद्या रुग्णालयात तातडीनं व्हेंटिलेटर उपलब्ध करायचं असेल तर ते शक्य होत नाही, त्यामुळं अनेक शहरांमधील रुग्णालयात जास्ती जास्त आणि तात्काळ व्हेंटिलेटरची सेवा उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचीही माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत दिली आहे.

IPL_Entry_Point