मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune-lonavala local megablock : पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक! 'या' लोकल रद्द तर या धावणार उशिरा

Pune-lonavala local megablock : पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक! 'या' लोकल रद्द तर या धावणार उशिरा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 11, 2024 06:29 AM IST

Pune-lonavala railway local megablock : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाद्वारे पुणे-लोणावळा दरम्यान आज (दि ११_ अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरच्या अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही लोकल उशिरा धावणार आहेत.

Pune-lonavala railway local megablock
Pune-lonavala railway local megablock

Pune-lonavala railway local megablock : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाद्वारे पुणे-लोणावळा दरम्यान आज रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. हा मेगाब्लॉक अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी घेतला जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरच्या धावणाऱ्या अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही लोकल गाड्या या उशिरा धावणार आहेत. नागरिकांनी याची दखल घेऊन प्रवास करावा असे आवाह करण्यात आले आहे.

Uddhav Thackeray : सबका साथ आणि मित्र का विकास; अब की बार हद्दपार.., उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

पुणे शिवाजीनगरहून या लोकल गाड्या रद्द :

१) पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ९.५७ वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे.

२) पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ११.१७ वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे.

३) शिवाजीनगरहून लोणावळ्यासाठी दुपारी १२.०५ वाजता सुटणारी लोकल रद्द.

४) पुण्याहून लोणावळ्यासाठी दुपारी ३ वाजता सुटणारी लोकल रद्द.

५) शिवाजीनगरहून तळेगावसाठी दुपारी ३.४७ वाजता सुटणारी लोकल रद्द.

६) पुण्याहून लोणावळ्यासाठी सायंकाळी ४.२५ वाजता सुटणारी लोकल रद्द.

७) शिवाजीनगरवरून लोणावळ्यासाठी सायंकाळी ५.२० वाजता सुटणारी लोकल रद्द.

राज्यात हे काय चाललंय..! मुंबईनंतर आता पुण्यात सराफ व्यवसायिकाने दुकान मालकावर गोळ्या झाडून स्वत: केली आत्महत्या

लोणावळ्याहून पुण्याला येणाऱ्या रद्द करण्यात आलेल्या लोकल :

१) लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सकाळी १०.०५ वाजता सुटणारी लोकल रद्द.

२) लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सकाळी ११.३० वाजता सुटणारी लोकल रद्द.

३) लोणावळ्याहून पुण्यासाठी दुपारी २.५० वाजता सुटणारी लोकल रद्द.

४) तळेगावहून पुण्यासाठी सायंकाळी ४.४० वाजता सुटणारी लोकल रद्द.

५) लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी ५.३० वाजता सुटणारी लोकल रद्द.

६) लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी ६.०८ वाजता सुटणारी लोकल रद्द.

७) लोणावळ्याहून पुण्यासाठी सायंकाळी ७ वाजता सुटणारी लोकल रद्द.

उशिरा धावणाऱ्या गाड्या

एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस साडेतीन तास उशिराने धावणार आहे. हा मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

WhatsApp channel