शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी नगरसेवकअभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर त्यांचा मारेकरी मॉरिस यानेही स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. मुंबईतील दहिसरमध्ये घडलेल्या या घटनेने राज्यात खळबळ माजली असून राजकीय वातावरण तापलं असतानाच अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. शनिवारी सायंकाळआर्थिक कारणावरुन एकासराफ व्यवसायिकाने आपल्या दुकान मालकावर भर चौकात गोळीबार करून नंतर स्वत:ही आत्महत्या केली. ही घटना बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलजवळ शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
अनिल ढमाले (वय ५२, रा. बालेवाडी) असेगोळीबार केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर या घटनेत आकाश गजानन जाधव (वय ४२, रा. बाणेर) असे जखमी झालेल्या दुकानमालकाचे नाव आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल ढमाले याने दुकान मालकावर गोळी झाडून तोरिक्षातून पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी जात होता. दरम्यान रिक्षातच त्यानेस्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली. जखमी झालेले जाधव यांचे बाणेर येथील हाय स्ट्रीटवर दुकान आहे. हे दुकान त्यांनी ढमाले यांना भाड्याने दिले आहे. अनिल ज्वेलर्स नावाने ही दुकान ढमाले चालवत होते.
दोघांच्यात गेल्या काही दिवसांपासून पैशाच्या देवघेवीवरून वाद सुरू होता. शनिवारी सायंकाळी जाधव व ढमाले एकाच दुचाकीवरून येत होते. त्यावेळी मागे बसलेल्या ढमाले याने जाधव यांच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर झमाले याने रिक्षा करून रिक्षा पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितले.
त्यानंतर रिक्षा औंध येथील भाले चौकात आली असता त्याने रिक्षा चालकाना पाणी आणण्यास पाठवले. रिक्षाचालक बाहेर जाताच ढमाले याने रिक्षातच स्वत:वर गोळी झाडली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांना ढमालेकडे सुसाईड नोट मिळाली. त्यात लिहिले होते की, मागील काही महिन्यांपासून जाधव त्याला त्रास देत होते. याला कंटाळून जीवन संपवण्याचे निर्णय घेत असल्याचे त्याने म्हटले आहे. ढमाले याच्याकडे पिस्तुल होते व त्याचा परवानाही होता. त्यात पिस्तुलमधून त्याने गोळीबार करुन स्वत:ही आत्महत्या केली आहे.