मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane crime : आता जिरेही बनावट! ठाण्यात बनावट जिरे बनविणारे रॅकेट उद्ध्वस्त, लाकडाचा भुसा अन् रसायनांचा वापर

Thane crime : आता जिरेही बनावट! ठाण्यात बनावट जिरे बनविणारे रॅकेट उद्ध्वस्त, लाकडाचा भुसा अन् रसायनांचा वापर

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 31, 2024 09:40 AM IST

fake cumin production racket in Palghar : ठाण्यात जेवणात फोडणीसाठी वापरण्यात येणारे जिरे बनावट पद्धतीने बनवणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या साठी लाकडाचा भुसा, बडिशेपच्या कांड्या व रसायनांचा वापर केला जत होता.

Thane crime News
Thane crime News

fake cumin production racket in palghar : तुम्ही जेवणात जे जिरे वापरत आहात ते आत खरे की खोटे हा प्रश्न तुम्हाला पडणार आहे. कारण ठाण्यात बनावट जिरे बनवणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश भिवंडी पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे हे बनावट जिरे बनवण्यासाठी बडिशेपच्या कांड्या, लाकडाचा भुसा व रसायनांचा वापर केला जात होता.

ट्रेंडिंग न्यूज

Bank holidays in February : २९ दिवसांच्या फेब्रुवारी महिन्यात तब्बल ११ दिवस राहणार बँका बंद; वाचा यादी

चेतन गांधी (वय ३४), शादाब खान (वय ३३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी तब्बल २ हजार ४०० किलो बनावट जिऱ्यांचा साठा देखील जप्त केला. व पालघर मधील हा कारखाना सील करण्यात आला आहे. या कारखान्यातून देखील ९०० किलो बनावट जिरे, रासायनिक पावडर असा ३ टनांपेक्षा आधी मुद्देमाल जप्त केला आहे.

China spy pigeon : अटक करण्यात आलेल्या चीनी हेर कबुतराची आठ महिन्यांच्या कोठडीनंतर मुंबईतून सुटका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना बनावट जिरे बनावट असल्याची माहिती मिळाली. त्यांनी या जीऱ्याची तपासणी केली असतात लाकडाच्या भुशाला वेगवेगळ्या रासायनिक पावडरचा थर देऊन जिरे बनवल्याचे आढळले होते. दरम्यान, पोलिस हे बनावट जिरे तयार करणाऱ्यांच्या मागावर होते. बनावट जिरे विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शांतीनगर पोलिसांनी सापळा रचून भिवंडी येथील फातमानगर येथील ९० फुटी रस्त्यावर सापळा लावला. यावेळी त्यांनी एक टेम्पो अडवत त्यातून ७ लाख १९ हजार ७०० रुपये किमतीचा दोन हजार ३९९ किलो बनावट जिऱ्याचा साठा जप्त केला. यात तब्बल ८० गोण्या बनावट जिरे होते. जिऱ्याच्या एका किलोची किंमत ही ३०० रुपये एवढी आहे.

पोलिसांनी चालक चेतन व शादाब यांना अटक करून त्यांची चौकशी केली असतात पालघर येथे बनावट जिरे तयार करणारा कारखाना असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी पालघर येथील नंडोरे येथे असलेल्या या कारखान्यावर धाड टाकत बनावट जिरे, रसायनांची पावडर असा ३० लाखांचा माल जप्त केला. आरोपी बनावट जिऱ्यांची विक्री हॉटेल, कॅटरर्स यांना करत होते. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता.

 

IPL_Entry_Point