Bank holidays in February 2024 : वर्षातील दुसऱ्या महिन्याला उद्या शुक्रवार पासून सुरुवात होणार आहे. यंदा लिप वर्ष असल्याने फेब्रुवारी महिना हा २८ ऐवजी २९ दिवसांचा आहे. मात्र, असे असले तरी फेब्रुवारीमध्ये, तब्बल ११ दिवस बँका बंद राहणार आहेत. यामुळे नागरिकांना बँकांच्या कामाची यादी करून त्यांचे नियोजन करावे लागणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवारी बँका बंद राहणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी बँका सुरू असतात. बँकांच्या काही सुट्ट्या तर राज्यात काही विशिष्ट सुट्ट्या असतात. परंतु राष्ट्रीय सुट्ट्यांमध्ये बँका देशभरात बंद राहणार आहेत.
रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) फेब्रुवारी महिन्यातील सुट्ट्याची यादी जाहीर केली आहे. आरबीआय तर्फे तीन निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत सुट्टी, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत सुट्टी आणि रिअल-टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडेज आणि बँकांचे खाते बंद करणे या साठी काही सुट्ट्या दिल्या जातात. आरबीआयने फेब्रुवारीच्या सुट्टीचे वेळापत्रक, बँका आणि वित्तीय संस्थांना पाठवली आहे.
४ फेब्रुवारी : रविवार
१० फेब्रुवारी: दुसरा शनिवार/लोसर ज्यामध्ये गंगटोक बंद राहील.
११ फेब्रुवारी : रविवार
१४ फेब्रुवारी: बसंत पंचमी/सरस्वती पूजा (श्री पंचमी) (आगरतळा, भुवनेश्वर, कोलकाता येथे बँका बंद राहतील)
१५ फेब्रुवारी: लुई-न्गाई-नी (इम्फाळमध्ये बँका बंद राहतील)
१८ फेब्रुवारी : रविवार
१९ फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराज जयंती (बेलापूर, मुंबई, नागपूर येथे बँका बंद राहतील)
२० फेब्रुवारी: राज्य दिन/राज्य दिनानिमित्त आयझॉल, इटानगरमध्ये बँका बंद राहतील
२४ फेब्रुवारी : दुसरा शनिवार
२५ फेब्रुवारी : रविवार
२६ फेब्रुवारी: न्योकुम (इटानगरमध्ये बँका बंद राहतील)
या सुट्टीच्या दिवशीही देशभरात ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सुट्टीच्या दिवशी हे व्यवहार करावे असे आवाहन करण्यात आले आहे.