मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धक्कादायक! जेवण देण्यास विसरल्याने श्वानाने मालकाचेच तोडले लचके; निष्ठावान प्राणी बनला भक्षक

धक्कादायक! जेवण देण्यास विसरल्याने श्वानाने मालकाचेच तोडले लचके; निष्ठावान प्राणी बनला भक्षक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 31, 2024 07:15 AM IST

rottweiler dog attack owner : ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एक ६३ वर्षीय व्यक्ती आपल्या कुत्र्याला खायला द्यायला विसरला. यानंतर कुत्र्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

rottweiler dog attack owner in gwalior madhya pradesh
rottweiler dog attack owner in gwalior madhya pradesh (AP)

rottweiler dog attack owner in gwalior madhya pradesh : सर्वात निष्ठावान प्राण्यांमध्ये श्वानाची गणना केली जाते. श्वान आणि मालक यांचे नाते हे जिव्हाळ्याचे असते. आपल्या मालकाच्या रक्षणासाठी श्वानाने जिवाची बाजी लावल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असेल. पण ग्वाल्हेर येथे थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथे एका ६३ वर्षीय व्यक्तिचा पाळीव कुत्रा त्याच्याच जिवावर उठल्याची घटना समोर आली आहे. तेजेंद्र घोरपडे असे या व्यक्तीचे नाव असून त्यांचा पाळीव कुत्रा त्यांच्या जीवाचा शत्रू ठरला.

Maharashtra weather update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात थंडीची लाट! गारठा वाढणार, असा आहे हवामानाचा अंदाज

ग्वाल्हेर येथे राहणारे तेजेंद्र घोरपडे हे एका रात्री त्यांच्या पाळीव श्वानाला खायला घालायला विसरले. दरम्यान, आपल्या कुत्राला जेवण दिले नसल्याची आठवण त्यांना रात्री झाली. त्यांनी त्याला जेवण देण्यासाठी आणले असतात, पाळीव कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या शरीराचे लचके तोडून खाल्ले. या हल्ल्यात तेजेंद्र घोरपडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या शरीरावर ६० हून अधिक जखमा झाल्या आहेत. त्यांनी कुत्र्याच्या हल्ल्यातून कसा तरी त्याचा जीव वाचवला.

Manoj jarange : ..तर १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

तेजेंद्र घोरपडे यांनी घराच्या रक्षणासाठी रॉटवेलर कुत्रा पाळला होता. सोमवारी ते त्याला रात्री जेवण देण्यास विसरले. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास याची आठवण येताच ते श्वानासाठी जेवण घेऊन तेले. मात्र, चिडलेल्या रॉटवेलर आपल्यावर हल्ला करेल याची त्यांना कल्पना देखील त्यांना नव्हती. ते पोहोचताच कुत्र्याने त्यांना अंगावर धावून जाऊन घोरपडे यांना खाली पाडले व त्याना चावण्यास सुरुवात केली.

दरम्यान, तेजेंद्र यांच्या मुलाला त्यांच्या ओरडण्याच्या आवाज येताच तो धावला. त्याने कसे बसे कुत्र्याचा पट्टा पकडत त्याला बाजूला केले. मात्र, तोपर्यंत कुत्र्याच्या हल्यात तेजेंद्र गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या अंगावर जखमा होत्या आणि रक्तस्त्राव देखील होत होता. मुलगा वेळेवर पोहोचल्याने त्यांचे प्राण वाचले. नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रॉटवेलर कुत्रा धोकादायक

रॉटविलर कुत्र्यांची गणना धोकादायक प्रजातींमध्ये केली जाते. हे कुत्रे इतके धोकादायक आहेत की, ज्यांच्यावर त्यांनी हल्ला केला त्या व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो. हे श्वान खूप आक्रमक मानले जाते. युरोप आणि अमेरिकेत अनेक ठिकाणी या कुत्र्याला पाळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. भारतात यावर बंदी नसली तरी पिटबुल कुत्रा पाळण्यावर बंदी आहे. हा सर्वात धोकादायक कुत्रा आहे. चिडलेले असताना हे श्वान कुणालाही सोडत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या कुत्राचा डीएनए लांडग्याच्या डीएनएशी जुळतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

WhatsApp channel

विभाग