मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  China spy pigeon : अटक करण्यात आलेल्या चीनी हेर कबुतराची आठ महिन्यांच्या कोठडीनंतर मुंबईतून सुटका

China spy pigeon : अटक करण्यात आलेल्या चीनी हेर कबुतराची आठ महिन्यांच्या कोठडीनंतर मुंबईतून सुटका

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 31, 2024 08:22 AM IST

China spy pigeon freed form mumbai : एका कबुतराच्या पायात अंगठ्या आणि काही संदेश बांधलेले काही महिन्यां;पूर्वी आढळून आले होते. हे कबुतर चीनी हेर असल्याच्या संशयातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तब्बल ८ महिन्यांच्या कोठडीनंतर त्याची सुटका करण्यात आली आहे.

China spy pigeon freed form mumbai
China spy pigeon freed form mumbai

China spy pigeon freed form mumbai : एका कबुतराच्या पायात अंगठ्या आणि काही संदेश बांधलेले काही महिन्यां;पूर्वी आढळून आले होते. हे कबुतर चीनी हेर असल्याच्या संशयातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हे कबुतर गेल्या आठ महिन्यांपासून परळ येथील बाई सक्करबाई दिनशॉ पेटिट हॉस्पिटल फॉर ॲनिमल्सच्या ताब्यात होते. अखेर पोलिसांच्या कोठडीत असलेल्या या कबुतराची मंगळवारी सुटका करण्यात आली.

ट्रेंडिंग न्यूज

Bank holidays in February : २९ दिवसांच्या फेब्रुवारी महिन्यात तब्बल ११ दिवस राहणार बँका बंद; वाचा यादी

गेल्या वर्षी १७ मे रोजी चेंबूरमधील आरसीएफ (राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स) पोलिसांनी पीर पौळ या रासायनिक प्रकल्पाच्या जेट्टीवर हे कबुतर आढळले होते. या कंबूतरांच्या पायाला दोन अंगठ्या - एक तांबे आणि एक ॲल्युमिनियम आणि त्याच्या दोन्ही पंखांच्या खालच्या बाजूला चिनी लिपीत लिहिलेले काही गुप्त संदेश आढळले होते. यामुळे पोलिसांचा संशय वाढला होता. अंगठ्या फॉरेन्सिक चाचणीसाठी नेण्यात आल्या, तर कबुतराला तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले होते.

रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉ मयूर डांगर यांनी सांगितले की, कबूतराची प्रकृती ठीक आहे. आम्ही हे कबुतर पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याने परवानगीशिवाय ते सोडू शकत नव्हतो.

Maharashtra weather update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात थंडीची लाट! गारठा वाढणार, असा आहे हवामानाचा अंदाज

हिंदुस्तान टाइम्सने या बाबत वृत्त दिले होते. आरसीएफ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार हे कबूतर तैवानमधील खुल्या पाण्यात शर्यतीत भाग घेत होते. अशाच एका कार्यक्रमात ते देशाबाहेर पाठवण्यात आले होते. मात्र, ते भरकटले आणि भारतात उतरले. पाटील म्हणाले की हेरगिरीचे आरोपातून कबूतराला वगळण्यात आले आहेत. या कबुतराला आधीच सोडण्यात आले असावे असा आमचा समज होता, मात्र, कबुतर अद्याप ताब्यात असल्याचे समजल्यावर त्याला सोडण्यात आले. हे कबुतर संसर्गजन्य आणि जखमी पक्ष्यांसाठी असलेल्या आठ पिंजऱ्यांपैकी एका पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. आरसीएफ पोलीस ठाण्याला या बाबत विचारले असता त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही, असे डांगर यांनी सांगितले.

दरम्यान, रुग्णालयाने २२ जानेवारी रोजी पोलिसांना पुन्हा पत्र लिहून या कंबूतराला सोडण्याची परवानगी मागितली होती. पोलिस ठाण्याने सोमवारी हॉस्पिटलला पत्र पाठवत, “हे कबुतर उपचारसाठी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी पाठवण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून त्याची प्रकृती चांगली असल्यास त्याला सोडण्यात हरकत नसल्याचे सांगितले.

रुग्णालयात केवळ आठ पक्ष्यांचे पिंजरे असून इतर पक्ष्यांना पक्षीगृहात उघड्यावर ठेवण्यात आल्याने रुग्णालयाला या कबुतराची सुटका केल्यामुळे दिलासा मिळाला. डॉ. डांगर म्हणाले, “कबुतर सोडण्यात आल्यावर त्याच्या पिंजऱ्यात दादरहून दोन घुबडांना ठेवण्यात आले. इतर पिंजऱ्यांमध्ये दोन पोपट, चार कबुतरे आणि एक पतंग पक्षी ठेवण्यात आला आहे.

IPL_Entry_Point

विभाग