मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BS Koshyari : ‘महाराष्ट्रात राऊत तर उत्तराखंडमध्ये रावत’, राजीनाम्यानंतर कोश्यारींचा शिवसेनेला चिमटा

BS Koshyari : ‘महाराष्ट्रात राऊत तर उत्तराखंडमध्ये रावत’, राजीनाम्यानंतर कोश्यारींचा शिवसेनेला चिमटा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 13, 2023 05:16 PM IST

BS Koshyari In Mumbai : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. त्यानंतर कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात हजेरी लावत जोरदार टोलेबाजी केली आहे.

Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari (HT)

Bhagat Singh Koshyari Speech In Mumbai : महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त राज्यपाल ठरलेल्या भगतसिंह कोश्यारी यांना केंद्रानं नारळ देत रमेश बैस यांना महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले दांम्पत्य आणि महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या मुंबईबाबत भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं त्यांना विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यानंतर खुद्द कोश्यारी यांनी पीएम नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना राज्यपालपदातून मुक्त करण्याची विनंती केली होती. परंतु आता कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर त्यांनी मुंबईतील एका कार्यक्रमाला हजेरी लावत चांगलीच राजकीय फटकेबाजी केली आहे. त्यामुळं त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नवी मुंबईतील भारतरत्न राजीव गांधी क्रीडा संकुल मैदानातील देवभूमी स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या कार्यक्रमात काळजीवाहू राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हजेरी लावली. यावेळी कार्यक्रमात बोलताना कोश्यारी म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता चांगली आहे. महाराष्ट्रात देशपांडे असतील तर आमच्याकडे पांडे आहेत. इथे राऊत असतील तर आमच्याकडे रावत आहेत, असं म्हणत कोश्यारींनी शिवसेना खासदार संजय राऊतांना जोरदार चिमटा काढला आहे.

सध्या परंपरा बदलत असून रक्षाबंधन आणि भाऊबीज साजरी केली जात आहे. आदिवासींच्या प्रथा आणि परंपरा या चांगल्या असल्यानं त्यांनीही त्या सोडू नयेत. याशिवाय समाजात खेळाला आणखी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. महाराष्ट्र आणि उत्तराखंडमधील लोक एकसारखीच आहेत. त्यामुळं लोकांनी संस्कृती आणि लोककलेला विसरू नये, असंही आवाहन कोश्यारी यांनी केलं आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात एकापेक्षा एक चांगले क्रिकेटचे खेळाडू आहेत. मुलांनी अभ्यास जरुर करावा, परंतु खेळांकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये चांगलं यश मिळवण्यासाठी आपल्याला आणखी प्रयत्न करावे लागणार असल्याचंही भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

IPL_Entry_Point