मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar rally : पुण्यात अजित पवारांच्या रॅलीत भाजप कार्यकर्त्यांनी फोडले फटाके; पवार म्हणाले...

Ajit Pawar rally : पुण्यात अजित पवारांच्या रॅलीत भाजप कार्यकर्त्यांनी फोडले फटाके; पवार म्हणाले...

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 13, 2023 11:32 AM IST

pune bypoll : पुण्यात सध्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. काल भाजप आणि महाविकास आघाडीने प्रचाराचा नारळ फोडला. अजित पवार हे काल रात्री रविंद्र धंगेकर यांच्या प्रचार रॅलीत आले असता भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडत गोंधळ घातला.

Ajit Pawar
Ajit Pawar (HT)

पुणे : पुण्यात कसबा आणि पिंपरी-चिंचवड येथील पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजप आणि महाविकास आघाडी तर्फे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीची रविवारी रात्री संयुक्त प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यात अजित पवार देखील उपस्थित होते. या रॅलीला अजित पवार संबोधित करत असतांना येथून जाणाऱ्या भाजपच्या रॅलीतील कार्यकर्त्यांनी हूल्लड बाजी केली तर काहींनी फटाके फोडले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत पवार यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी पवार यांनी त्यांचे भाषण सुरू ठेवत त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले.

ट्रेंडिंग न्यूज

कसबापेठे येथे सध्या पोटनिवडणुकीचा ज्वर सुरू आहे. रविवारी महाविकास आघाडीतर्फे कसबा मतदारसंघात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विरोधीपक्ष नेते अजित पवार, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे तसेच आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पवार यांचे भाषण सुरू असतांना बाजूनेच भाजपची रॅली गेली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके आणि हूल्लड बाजी करत पवार यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी त्यांनी त्यांचे भाषण सुरूच ठेवले. दरम्यान भाषण झाल्यावर पत्रकारांनी त्यांना या संदर्भात विचारले असता पवार म्हणाले, मी त्याला जास्त महत्व देत नाही. गेले ३१ वर्ष मी राजकारणात आहे, असे किती तरी जण फटाके वाजवणारे आले आणि गेले मी त्याचा विचार करत नाही, असंही ते म्हणाले.

राष्ट्रवादी पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, भारतीय जनता पार्टीला आपला पराभव दिसायला लागला आहे. म्हणून शहर भाजपच्या वतीने अजित पवार यांचे भाषण सुरू होताच जोरदार घोषणा देणे आणि फटाके वाजण्याच्या खोडसाळपणा केला गेला आहे.

 

IPL_Entry_Point