मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Baramati murder : बारामती येथे जुन्या वादातून हत्याकांड! कोयता व कुऱ्हाडीने हल्ला करत इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याचा खून

Baramati murder : बारामती येथे जुन्या वादातून हत्याकांड! कोयता व कुऱ्हाडीने हल्ला करत इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याचा खून

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 19, 2024 11:31 AM IST

Baramati youth murder : बारामती येथे एका महाविद्यालयीन तरुणाची कोयता आणि कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना उंडवडी सुपेच्या बसस्थानकावर गुरुवारी दुपार नंतर घडली.

बारामतीत जुन्या वादातून हत्याकांड! कोयता व कुऱ्हाडीने हल्ला करत कॉलेज तरुणाची हत्या
बारामतीत जुन्या वादातून हत्याकांड! कोयता व कुऱ्हाडीने हल्ला करत कॉलेज तरुणाची हत्या

Baramati youth murder : बारामती येथील उंडवडी सुपे येथे बारामती बसमधून आलेल्या एका तरूणावर चार ते पाच जणांनी कोयता आणि कुऱ्हाडीने हल्ला करून त्याची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. महापुरुषाच्या जंयतीवरुन तसेच जुन्या वाडातून ही हत्या करण्यात आल्याचे तपसात उघड झाले आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात अलायी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Narendra Modi : दहा वर्षांत पहिल्यांदाच नरेंद्र मोदी महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; वर्धा येथे आज जाहीर सभा

विनोद भोसले (करखेल, ता. बारामती) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. तर त्याच्या खून प्रकरणी आरोपी यश मांढरे, सुमित भापकर, सुयश भापकर, वैभव भापकर यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद हा बारामती येथे कॉम्पुटर इंजिनिरींगचे शिक्षण घेत होता. तो गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजता एसटी बसने उंडवडीच्या बसस्थानकावर उतरला. यावेळी विनोद वर कारखेलमधीलच यश मांढरे, सुमित भापकर, सुयश भापकर, वैभव भापकर या चौघांनी कोयता व कुऱ्हाडीने हल्ला केला. विनोदवर चौघांनी अनामुषपणे वर केले. यात विनोद हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला स्थानिकांनी दवाखान्यात भरती केले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

Ashutosh Sharma : १० वर्षांचा असताना घर सोडलं, आज बनला आयपीएलचा नवा स्टार, आशुतोष शर्मा कोण आहे? वाचा

जुन्या वादातून केला खून

पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी त्यांची चौकशी केल्यावर धक्कादायक कारण त्यांनी संगितले. गावात शिवजयंतीच्या वेळी झालेल्या वादातून तसेच दुचाकीवरुन जाताना कट मारल्याचा रागातून त्यांनी विनोदचा खून केल्याचे संगितले. या प्रकरणी सुपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बारामतीचे उपविभागिय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली

Loksabha Election : गडकरी, बालियान, चिदंबरम यांच्यासह तब्बल १५ बड्या नेत्यांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये आज होणार कैद

ग्रामीण भागातही कोयता गँगचा उच्छाद

पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागातही कोयता गँगची दहशत वाढू लागली आहे. विनोदचा खून देखील क्षृल्लक कारणावरुन करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वाढलेले हे प्रकार थांबवण्याचे आवाहन पोलीसांपुढे आहे.

 

IPL_Entry_Point