मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Loksabha Election : गडकरी, बालियान, चिदंबरम यांच्यासह तब्बल १५ बड्या नेत्यांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये आज होणार कैद

Loksabha Election : गडकरी, बालियान, चिदंबरम यांच्यासह तब्बल १५ बड्या नेत्यांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये आज होणार कैद

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 19, 2024 09:52 AM IST

Loksabha Election Update : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली. तब्बल १०२ जागांवर होणाऱ्या निवडणुकीत गडकरी, बालियानपासून चिदंबरमपर्यंत यारख्या तब्बल १५ मोठ्या चेहऱ्यांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद होणार आहेत.

गडकरी, बालियान, चिदंबरम यांच्यासह तब्बल १५ बड्या नेत्यांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये आज होणार कैद
गडकरी, बालियान, चिदंबरम यांच्यासह तब्बल १५ बड्या नेत्यांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये आज होणार कैद

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुक २०२४ च्या पहिल्या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ लोकसभा जागांसाठी आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या १०२ जागांसाठी तसेच अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेच्या ९२ जागांसाठी देखील मतदान होत आहे. या निवडणुका निष्पक्ष आणि शांततेत पार पाडाव्या यासाठी निवडणूक आयोगाने चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

वृद्ध व दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १६.६३ कोटी मतदार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, किरेन रिजिजू, अर्जुन राम मेघवाल, एकूण ८ केंद्रीय मंत्री, २ माजी मुख्यमंत्री आणि माजी राज्यपाल यांच्यासह १ हजार ६०५ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरवणार आहेत.

Loksabha Election first phase voting live : देशात मतदानाला शांततेत सुरूवात! अनेक दिग्गजांनी बजावला हक्क

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी नागपूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी उभे आहेत. मोठ्या मताने विजयी होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर केंद्रीय भूविज्ञान राज्यमंत्री किरेन रिजिजू यांचा सामना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि अरुणाचल पश्चिम जागेवर काँग्रेसचे उमेदवार नबाम तुकी यांच्याशी होत आहे. केंद्रीय जहाज, जलमार्ग आणि बंदरे मंत्री उपनगरानंद सोनोवाल आसाममधील दिब्रुगडमधून निवडणूक लढवत रिंगणात उभे आहेत.

केंद्रीय मंत्री संजीव बल्यान यूपीच्या मुझफ्फरनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पहिल्या टप्प्यात उधमपूरच्या जागेवर पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांचे निवडणूक भवितव्य ठरणार आहे. जितेंद्र सिंह यांचे सहकारी भूपेंद्र यादव राजस्थानच्या अलवर मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत. राजस्थानच्या बिकानेर जागेवर कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मंत्री गोविंद राम मेघवाल यांच्या विरोधात लढत आहेत.

Pune yerwada firing : पुण्यात सलग चौथ्या दिवशी गोळीबार! येरवड्यात पहाटे जुन्या वादातून एकावर गोळीबार; ६ जणांना अटक

माजी मंत्री आणि द्रमुकचे खासदार ए राजा यांचे भवितव्य निलगिरी मतदारसंघातील मतदारांच्या निर्णयावर ठरणार आहे. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम पुन्हा शिवगंगा जागा जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तेलंगणाचे माजी राज्यपाल तमिलिसाई सौंदराराजन, चेन्नई दक्षिण मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर उमेदवार आहेत. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री पश्चिम त्रिपुराच्या जागेवर नशीब आजमावत आहेत. मणिपूरचे कायदा आणि शिक्षण मंत्री बसंत कुमार सिंह हे इनर मणिपूर जागेवरून भाजपचे उमेदवार आहेत. त्यांना जेएनयूचे प्राध्यापक आणि काँग्रेस उमेदवार विमल ओकोइजम यांच्याशी सामना करावा लागणार आहे. कोईम्बतूर येथील भाजपचे उमेदवार के. अन्नामलाई आणि द्रविड मुन्नेत्र कळघमच्या उमेदवार कनिमोझी ठाठकडीमधून रिंगणात आहेत. भाजपचे उमेदवार जितिन प्रसाद उत्तर प्रदेशातील पिलीभीत लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुल नाथ छिंदवाडामधून काँग्रेसकडून नशीब आजमावत आहेत.

चोख सुरक्षा व्यवस्था

मतदानासाठी १.८७ लाख केंद्रे स्थापन करण्यात आली आहे. शांततेत मतदानासाठी १८ लाख कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अरुणाचल आणि सिक्कीम राज्यातील विधानसभा निवडणुकीतील १०२ मतदारसंघ आणि ९२ विधानसभा मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. इतर टप्प्यांच्या तुलनेत पहिल्या टप्प्यात सर्वाधिक मतदारसंघ आहेत. याशिवाय मतदान आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी ४१ हेलिकॉप्टर, ८४ विशेष गाड्या आणि सुमारे १ लाख वाहने तैनात करण्यात आली आहेत.

WhatsApp channel