Israel launches missile attack in response to Iran assault : इराणच्या हल्यानंतर शांततेचे आवाहन करून देखील इस्रायलने इराणवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचे वृत्त आहे. इराणच्या इस्फहान शहरातील विमानतळावर मोठा स्फोट ऐकू आला. मात्र, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे इराणने इस्फहानमध्ये त्यांचा अण्वस्त्र कार्यक्रम राबावत आहे. काही दिवसांपूर्वीच इराणनेही इस्रायलवर तब्बल २०० ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका अमेरिकन अधिकाऱ्याने एबीसी न्यूजला सांगितले की, इस्रायली क्षेपणास्त्रांनी इराणवर हल्ला केला आहे. मात्र, क्षेपणास्त्रे इराक किंवा सीरियापर्यंत पोहोचली होती का, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. इस्फहानजवळील तबरीझ शहरातही स्फोटांचे आवाज ऐकू आले. यासंबंधीचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आले आहेत. इस्रायली मिसाइलने इराणच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीला टार्गेट केलं आहे अशी माहिती आहे. इस्रायलच्या डिफेन्स फोर्सने सांगितलं की, उत्तर इस्रायलच्या अरब अल अरामशेमध्ये इमर्जन्सी सायरन वाजवला गेला. या माध्यमातून सर्वसामान्य नागरीक आणि स्थानिक प्रशासनाला सतर्क केलं जातं
१३ एप्रिल रोजीच इराणने आधी इस्रायलवर थेट हल्ला केला. त्यादरम्यान इराणने इस्रायलवर ३०० हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले होते. दमास्कसमधील इराणच्या दूतावासावर १ एप्रिलला झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने १३ एप्रिल रोजी कारवाई केली. विशेष म्हणजे यानंतर अनेक देश युद्धाची परिस्थिती टाळण्यासाठी दोन्ही देशांना समजावण्याचा प्रयत्न करताना दिसले.
दरम्यान, जर हा हल्ला झाला असेल तर इराण पुन्हा भडकण्याची चिन्हे आहेत. यामुळे या परिसरात एक मोठे युद्ध सुरू होऊ शकते. असे झाल्यास याचे गंभीर परिमाण भारतासह जागावर होणार आहे.
खरे तर काही दिवसांपूर्वी सीरियातील इराणच्या वाणिज्य दूतावासावर इस्रायलने हवाई हल्ला केला होता. यात इराणचे बडे लष्करी अधिकारी ठार झाले होते. त्यानंतर इराणने स्थानिक प्रॉक्सीचा वापर करून इस्रायलवर हल्ले सुरू करण्याची योजना आखली. मात्र, इराणने आपल्या मागण्या पूर्ण झाल्यास तणाव कमी करण्यास तयार असल्याचे संकेत दिले होते. तेहरानने स्पष्ट केले की गाझा वरील हल्ले कमी केल्यास इराण वाद वाढवणार नाही. तसेच तणाव निर्माण करणार नाही. गाझा पट्टीतील युद्धबंदीसह आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आपण मागे हटणार नसल्याचे इराणने म्हटले आहे. इराणला आण्विक कार्यक्रमावर पुन्हा चर्चा सुरू करायची आहे. मात्र, इस्रायलने गाझावरील हल्ले सुरच ठेवले आहेत. दरम्यान, अमेरकेने इस्रायलला शांत राहण्याचे आवाहन केले होते. अमेरिकेची मागणी फेटाळून इस्रायलने इराणवर प्रतीहल्ला केल्याने वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या