Maharashtra Weather update : राज्यात अवकाळी पाऊस आणि उष्णतेची लाट असे दोन्हीचे संकट कायम आहे. पुढील ७ दिवस राज्यात विविध भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. किनारपट्टी सोडून राज्याच्या बहुतांश भागात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि गारपिट होण्याची शक्यता आहे. आज मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकण गोव्यामध्ये आणि २१ व २२ तारखेला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये आज हवामान कोरडे राहणार आहे. तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तसेच उद्यापासून विदर्भात पुढील पाच ते सात दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटसह वादळीवारा व पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळ ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागासाठी येलो अलर्ट दिलेला आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात १८ एप्रिलला उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे आजूबाजूच्या परिसरात पुढील पाच ते सात दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर मेघगर्जना व विजांच्या कडकडाटा सहित वादळी वारा व पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी पुण्यात विक्रमी तापमान नोंदवल्या गेले. तब्बल ४१ अंश सेल्सिअस च्या पुढे तापमान पुण्यात होते. गेल्या ११ वर्षातील हे सर्वाधिक तापमान होते.
मुंबईसह किनारपट्टीला गुरुवारी तापमानात घट पाहायला मिळाली. यामुळे वाढत्या उकड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. किनारपट्टीवर सरासरी कमाल तापमान ३४ अंशांवर राहिले. तर मध्य महाराष्ट्रात सरासरी ३९ तर मराठवाडा आणि विदर्भात कमाल पारा सरासरी ४२ अंश सेल्सिअस नोंदवल्या गेले. विदर्भात बुधवारच्या तुलनेत गुरुवारी कमाल तापमानात सरासरी दोन अंशांनी वाढले.
राज्यात बहुतांश जिल्ह्यात विक्रिमी तापमान नोंदवल्या गेले. सरासरी तापमान ४१ अंश सेल्सिअस नोंदवल्या गेले. राज्यात सर्वाधिक तापमान जळगावमध्ये नोंदवल्या गेले. येथे पारा हा ४३.२ अंश सेल्सिअसवर गेल्याने जळगाव राज्यातील सर्वाधिक उष्ण जिल्हा ठरला आहे. छत्रपती संभाजीनगरचे आजचे तापमान ४२.२ अंश सेल्सिअस तर परभणीचे तापसान ४२.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
संबंधित बातम्या