PM Modi campaign in Vidarbha loksabha election 2024 : देशात आज लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रात पुर्व विदर्भातील पाच मतदार संघात मतदान सुरू आहे. तर देशात १०२ मतदार संघासाठी मतदान सुरू आहे. यानंतर विदर्भातील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराचा नारळ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फोडला जाणार आहे. आज १९ एप्रिलला वर्धा येथील तळेगाव येथे ५.१५ वाजता त्यांची सभा होणार आहे. या सभेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक दिवसांचा मुक्काम नागपूर येथे करणार आहे. पंतप्रधान झाल्यापासून तब्बल १० वर्षांनंतर मोदी हे पहिल्यांदाच राज्यात मुक्कामी थांबणार आहेत.
राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. आज विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, रामटेक, नागपूर आणि चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी सकाळपासून मतदान सुरू झाले आहे. विदर्भात दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे २६ एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान, भाजपचे चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी या पूर्वी सभा घेतली आहे. तर रामटेक येथेही त्यांची सभा या पूर्वी झाली आहे. राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा येथे येणार आहे.
वर्धा येथे तळेगाव येथे त्यांची सभा होणार असून या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा मंडप उभारण्यात आला आहे. तसेच मोदी यांच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात येणार आहे. वर्धा येथून विद्यमान खासदार रामदास तडस हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. तर अमरावती येथून नवनीत राणा या उभ्या आहेत. विदर्भातील भाजपच्या इतर उमेदवारांच्या प्रचाराठी मोदी हे विदर्भात सभा घेणार आहे. वर्धा येथील सभा झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २० एप्रिल रोजी देखील राज्यात सभा होणार आहेत परभणी, नांदेड आणि हिंगोली येथे होणाऱ्या सभांना पंतप्रधान मोदी हे संबोधित करण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्यातील मतदान होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज १९ एप्रिलला वर्धा येथील सभा झाल्यावर २० तारखेला देखील सभा आहेत. १९ सभा झाल्यावर ते नागपूर येथे मुक्कामी थांबणार आहेत. वर्धा येथे भाजपचे रामदास तडस उमेदवार आहेत. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदा मोदी हे नागपूरला मुक्कामी थांबणार आहेत. गेल्या काही दिवसांतील मोदी यांचा हा दुसरा विदर्भ दौरा असेल. त्यांनी सर्वप्रथम चंद्रपूर येथे सभेला संबोधित केले होते. त्यानंतर रामटेक लोकसभा मतदारसंघात त्यांची सभा झाली.