Ashutosh Sharma : १० वर्षांचा असताना घर सोडलं, आज बनला आयपीएलचा नवा स्टार, आशुतोष शर्मा कोण आहे? वाचा-pbks vs mi ashutosh sharma life story who is ashutosh sharma left home at the age of 10 ipl changed his career ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ashutosh Sharma : १० वर्षांचा असताना घर सोडलं, आज बनला आयपीएलचा नवा स्टार, आशुतोष शर्मा कोण आहे? वाचा

Ashutosh Sharma : १० वर्षांचा असताना घर सोडलं, आज बनला आयपीएलचा नवा स्टार, आशुतोष शर्मा कोण आहे? वाचा

Apr 19, 2024 10:58 AM IST

who is ashutosh sharma : आशुतोष शर्मा याचा जन्म मध्य प्रदेशातील रतलाम या छोट्याशा गावात झाला आणि त्याचे शिक्षण इंदूरमध्ये झाले. आशुतोष २०२३ साली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीद्वारे प्रकाशझोतात आला.

Ashutosh Sharma : आयपीएलचा नवा स्टार आशुतोष शर्मा कोण आहे? चौकार कमी, षटकार जास्त मारतो, पाहा
Ashutosh Sharma : आयपीएलचा नवा स्टार आशुतोष शर्मा कोण आहे? चौकार कमी, षटकार जास्त मारतो, पाहा (IPL)

बॉलीवूड चित्रपट संजू मधील 'कर हर मैदान फतेह' हे गाणं पंजाब किंग्सचा फलंदाज आशुतोष शर्मावर अगदी फिट बसते. आशुतोष शर्मा आता आयपीएलचा नवा सुपरस्टार बनला आहे. आयपीएलमध्ये स्टार फलंदाज होण्यापूर्वी आशुतोष शर्माच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. 

आशुतोष शर्मा याचा जन्म मध्य प्रदेशातील रतलाम या छोट्याशा गावात झाला आणि त्याचे शिक्षण इंदूरमध्ये झाले. आशुतोष २०२३ साली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीद्वारे प्रकाशझोतात आला. अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या ग्रुप स्टेज मॅचमध्ये आशुतोषने ११ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. हे भारतीय बॅट्समनचे T20 मधील सर्वात वेगवान अर्धशतक आहे.

आता त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएलचे पहिले अर्धशतक ठोकले आहे. त्याने २८ चेंडूत ७ षटकार आणि २ चौकारांच्या साह्याने ६१ धावाकेल्या.

दरम्यान, आशुतोष शर्माचे आयुष्य लहानपणापासून आणि रेल्वेत नोकरी मिळण्याआधी अनेक अडचणींनी भरलेले होते. त्या अंधाराच्या गर्तेतून बाहेर पडलेल्या आशुतोषने मेहनतीने आपले जीवन उजळून टाकले आहे. आयपीएलमधील पहिले अर्धशतक झळकावून त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

आशुतोष शर्मा हा मध्य प्रदेशातील रतलाम शहरातील रहिवासी आहे. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी तो इंदूरला आला. येथे त्याचे जीवन अडचणींनी भरलेले होते. वयाच्या १० व्या वर्षापासून तो स्वतः स्वयंपाक आणि कपडे धुवायचा. अनेक वेळा आशुतोषकडे पैसे नसल्यामुळे त्याला अंपायरिंग करून पैसे कमवावे लागले, ज्यामुळे त्याला दिवसातून किमान एक वेळ जेवण मिळू शकत होते, परंतु माजी भारतीय क्रिकेटर अमेय खुर्सियाने त्याला एमपीसीए अकादमीमध्ये सामील केले तेव्हा त्याचे नशीब बदलले.

रेल्वेने विश्वास व्यक्त केला 

२०१८ मध्ये, आशुतोषने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशसाठी पदार्पण केले. पुढच्या हंगामात MP साठी त्याने T20 सामन्यात ८४ धावा केल्या. २०२० मध्ये अंडर-२३ मध्ये दोन शतके झळकावली. पण असे असूनही त्याला अनेकवेळा संघातून बाहेर काढण्यात आले. यानंतर त्याने रेल्वेत रुजू होण्याचा विचार केला. रेल्वेतील प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांनी आशुतोषवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आणि त्याला खूप मदत केली.

आयपीएलमधील पहिले अर्धशतक

आज तो आयपीएलमधील आपल्या दमदार कामगिरीने खूप चर्चेत आहे. मिनी लिलावात पंजाब किंग्जने आशुतोषला २०  लाख रुपयांना विकत घेतले. पंजाबकडून आतापर्यंत ४ सामन्यांमध्ये आशुतोषने १७ चेंडूत ३१ धावा, १५ चेंडूत नाबाद ३३, १६ चेंडूत ३१ धावा आणि २८ चेंडूत ६१ धावांची खेळी केली आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्याला विजय मिळवून देऊ शकला नाही. पण त्याने चाहत्यांची मनं नक्कीच जिंकली.