मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chinchwad Rape Case : लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर लोणावळ्यात बलात्कार, फरार आरोपीचा शोध सुरू

Chinchwad Rape Case : लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर लोणावळ्यात बलात्कार, फरार आरोपीचा शोध सुरू

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 07, 2023 07:52 PM IST

Pimpri Chinchwad Crime News : लग्नाचं आमिष दाखवून आरोपीनं तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

Pimpri Chinchwad Rape Case
Pimpri Chinchwad Rape Case (HT_PRINT)

Pimpri Chinchwad Rape Case : पिंपरीतील हत्येची घटना ताजी असतानाच आता चिंचवडमधील तरुणीवर लोणावळ्यात बलात्कार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केला असून पीडितेचे आक्षेपार्ह व्हिडिओ देखील शूट केले आहे. त्यामुळं आता या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. पीडित तरुणी ही चिंचवडमध्ये राहणारी असल्यामुळं आता चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी चिंचवडमधील तरुणीची इन्स्टाग्रामवर एका तरुणाशी ओळख झाली होती. दोघांमध्ये मैत्री झाल्यानंतर भेटीगाठी वाढल्या. त्यानंतर आरोपीनं तरुणीला लग्नाचं आश्वासन देत तिच्यावर पिंपरी-चिंचवड शहरासह लोणावळ्यात बलात्कार केला. याशिवाय पीडित तरुणीकडून आरोपीनं पाच लाख रुपये आणि पाच तोळे सोन्याचे दागिनेही घेतले. त्यानंतर तरुणीनं लग्नाची मागणी केल्यानंतर त्यासाठी आरोपी तरुणानं नकार देत तिला धमकावण्यास सुरुवात केली. याशिवाय आरोपीनं अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शारिरीक आणि मानसिक छळाला कंटाळलेल्या पीडितेनं थेट पोलीस ठाणे गाठत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली.

आरोपीनं तरुणीला आणि तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे. याशिवाय सोशल मीडियावर बदनामीकारक मेसेज केल्याचाही आरोपी पीडितेनं आरोपीवर केला आहे. त्यानंतर आता चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. पीडितेनं तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

IPL_Entry_Point