Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
जेवत असताना चिंटू म्हणतो : पप्पा तुमच्या डाळीत....
पप्पा : शांत बस... किती वेळा तुला सांगितलं, जेवताना असं मध्ये बोलू नये म्हणून.
जेवण झाल्यानंतर…
पप्पा : आता सांग चिंटू मगाशी काय बोलत होतास?
चिंटू : पप्पा, तुमच्या डाळीत माशी पडली होती, तेच सांगायचं होतं!
…
बायको : काय हो! मी जेव्हा जेव्हा गाणं गाते,
तेव्हा तुम्ही घरा बाहेर निघून का जाता?
नवरा : कारण, बाहेरच्या लोकांना असं वाटू नये,
की मी तुला त्रास देतोय किंवा तुझा गळा दाबतोय.
…
गुरुजी : मला सांग, जगात एकूण किती देश आहेत?
पप्पू : काय सर, माझी गंमत करताय का?
जगात अवघा एकच देश आहे, तो म्हणजे भारत...
बाकी सगळे विदेश आहेत...
गुरुजींनी पप्पूला तुडवलाच!
…
बंड्या : भावा, मी उद्या सर्कस बघायला जाणार आहे.
चिंट्या : मी माझ्यासोबत बायको आणि मेहुणीला पण घेऊन येतो.
बंड्या : अरे पण तुझी बायको आणि मेहुणी दोघी वाघाच्या पिंजऱ्यात पडल्या तर तू कोणाला वाचवशील?
चिंट्या : छे, मी आधी वाघाला वाचवणार. असेही जगात वाघ उरलेत किती?
बंड्याने काही न बोलताच सरळ कलटी मारली…
संबंधित बातम्या