Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
सुट्टी असल्यामुळं नवरा खुशीत असतो. त्याला बायकोची.
नवरा - गुढीवर तांब्या उलटा का लटकवतात?
बायको - तुम्ही एवढे इंजिनीअर आहात ना, मग सरळ लटकवून दाखवा!
…
पोलीस : काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री?
बेवडा : प्रवचन ऐकायला...!
पोलीस : कोणत्या विषयावर प्रवचन आहे?
बेवडा : दारूपासून होणारे दुष्परिणाम....
पोलीस : एवढ्या रात्री कोण देतं प्रवचन
बेवडा : माझी बायको...!!!
…
याला म्हणतात Attitude…
एका लहान मुलाला विचारले
'कोणत्या शाळेत जातोस?'
तो म्हणाला 'मी जात नाही!... मला पाठवतात...
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)