Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
महिलांच्या गोड समस्या…
सासूला सून आणि सुनेला सासू चांगली मिळत नाही!
नणंदेला वहिनी आणि वहिनीला नणंद चांगली मिळत नाही!
थोरलीला धाकटी आणि धाकटीला थोरली जाऊ चांगली मिळत नाही!
हे सगळं एकवेळ मिळालं तरी कामवाली चांगली मिळत नाही!
राहता राहिला नवरा, तो आजपर्यंत कोणाला चांगला मिळालाय?
…
बंड्या परीक्षेचा पहिला पेपर देऊन घरी आला…
शेजारच्या काकांनी विचारलं, काय बंडू, पेपर कसा होता?
बंड्या - स्वच्छ होता. म्हणून मी अजिबात घाण नाही केला!
काकांनी नंतर कधीच बंड्याला प्रश्न विचारल नाही!
…
हल्लीचे पालक मुलांना सांगतात की मोठा माणूस व्हायचं असेल तर JEE आणि NEET ची परीक्षा दे.
आमच्या वेळेस पालक सांगायचे की…
जी (JEE) परीक्षा देशील ती नीट (NEET) दे म्हणजे झालं.
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)