Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
यमराज : चल बाळ , तुझी माझ्या सोबत यायची वेळ आता आली.
तो : का ? इतक्यात का येऊ मी... सगळे रिपोर्ट्स माझे नॉर्मल आले आहेत , कालच पूर्ण चेक अप झालं. बीपी नाही, शुगर नाही.
अगदी फिट अँड फाईन आहे मी.
रोज जीम करतोय. डाएट फॉलो करतोय. नो प्रोब्लेम at all...
यमराज : बाळ , तुझा मोबाइल फोन तू घरी विसरून आला आहेस , तुझ्या गर्लफ्रेंडचा फोन आला होता आणि सध्या तुझ्या बायकोचे आणि तुझ्या गर्लफ्रेंडचे संभाषण सुरू आहे आणि काय सांगू???
आणि हो , तुझा पासवर्ड तुझ्या बायकोला माहिती होता जे तुला तिनं कधीच सांगितलं नव्हतं.
तो : मी रेड्यावर पुढे बसणार!
…
शेजारी - प्लीज, मला रविवारपुरता तुमचा तबला द्या का?
तबलजी - अरे व्वा! माझं वादन ऐकून तुम्हालाही आवड निर्माण झाली वाटतं?
शेजारी - नाही हो
किमान सुट्टीदिवशी तरी मला शांतपणे झोपायचंय!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)