मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : मुलगी जेव्हा डॉक्टरांना पोटात दुखण्याचं कारण सांगते…

Joke of the day : मुलगी जेव्हा डॉक्टरांना पोटात दुखण्याचं कारण सांगते…

HT Marathi Desk HT Marathi
Mar 28, 2024 10:04 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Joke of the day : मुलगी जेव्हा डॉक्टरांना पोटात दुखण्याचं कारण सांगते…
Joke of the day : मुलगी जेव्हा डॉक्टरांना पोटात दुखण्याचं कारण सांगते…

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

मुलगी - डॉक्टर साहेब माझ्या पोटात दुखतंय

डॉक्टर - काय खाल्लं होतं काल?

मुलगी - पिझ्झा, बर्गर, फालुदा विथ आइसक्रीम

डॉक्टर - हा दवाखान आहे, फेसबुक नाही.

इथं खरं खरं सांगायचं!

मुलगी - शिळा फोडणीचा भात.

सासू - तुला स्वयंपाक करता येत नाही?

सून - नाही.

सासू - मग हे लग्नाआधी का नाही सांगितलंस?

सून - तुम्हाला सरप्राइज द्यायचं होतं!

गुरुजी - दळणवळण म्हणजे काय?

बंड्या - एखादी मुलगी जेव्हा दळण घेऊन जाताना मागे वळून पाहते, त्या क्रियेला दळणवळण असं म्हणतात!

गुरुजी राजीनामा देऊन आषाढी वारीला निघालेत…

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

WhatsApp channel

विभाग