Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
डॉक्टरांनी महिलेला दिल्या डायटिंगच्या टिप्स…
अशा गोष्टींपासून दूर राहा, ज्या गोष्टींमुळं तुमचं वजन वाढेल.
महिला : म्हणजे नेमक्या कोणत्या गोष्टी डॉक्टर?
डॉक्टर : जसं की वजनकाटा, आरसा, तुमचे स्व:तचे फोटो आणि खासकरून सडपातळ बांध्याच्या मैत्रिणी.
…
एक मुलगी प्रियकराला मेसेज करते….
मुलगी : ए मला जोक पाठवना.
प्रियकर मेसेज करतो…
मुलगा : मी अभ्यास करतोय, आता मला वेळ नाहीये.
मुलगी : अरे व्वा! आणखी एक पाठव.
…
एक वैतागलेला मित्र दुसऱ्याला म्हणतो…
मी कुठलंही काम सुरू केलं की बायको मध्ये येते
दुसरा मित्र - तू ट्रक चालवायला सुरू कर.
कदाचित तुझं नशीब साथ देईल!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या