Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
बाब्या पोलीस ठाण्यात गेला आणि त्यानं पोलिसांकडे तक्रार नोंदवली…
बाब्या - साहेब मला फोन सतत धमक्या येत आहेत.
पोलीस - कोण आहे तो जो तुम्हाला धमक्या देतोय?
बाब्या - साहेब, एमएसईबीवाले.
म्हणतात, बिल नाही भरलं तर कापून टाकीन.
…
काही बायकांची सारखी तक्रार असते…
अर्धच डोसकं दुखतंय!
आता ह्यांना कोण सांगणार,
जेवढं असतं तेवढंच दुखणार म्हणून
…
मास्तर - सांगा, बरं मासे का बोलत नाहीत?
बंड्या - तुम्हाला तरी बोलता येईल का?
आख्खं थोबाड पाण्यात बुडवून
…
मुलगा - मी जीव द्यायला जातोय
मुलगी - का रे, अचानक असं का बोलतोयस?
मुलगा - तुझ्या नादात खूप कर्ज झालंय माझ्यावर
मुलगी - शेवटचा एक पांढऱ्या रंगाचा ड्रेस घेऊन दे ना,
तुझ्या तेराव्याला काय घालणार मी?
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)